अमेरिकेसह जगाच्या प्रचंड मोठया नुकसानाला फक्त आणि फक्त चीनच जबाबदार : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेसह जगाच्या अतोनात नकसानाला चीन जबाबदार असल्याच वक्तव्य आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. याच कारण अर्थातच कोरोना आहे. कोरोनामुळे अनेक देशांची आर्थिक घडी आणि गणित विस्कटले आहे. चायना व्हायरस असं नाव ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला दिलं आहे. यापूर्वी त्यांनी चीनवर या व्हायरसवरून आरोप केले आहेत. आता तर अमेरिकेसह जगात जे काही नुकसान होतंय त्याला चीन जबाबदार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंट वरून हे ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात की अमेरिकेसह जगभरात जे काही अतोनात नुकसान होतंय त्याला चीन जबाबदार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ लागला होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला गंभार्याने घेतले नाही. तसेच त्यांना व्हायरसला वुहान व्हायरस, चायना व्हायरस अशी नावं दिली.

मात्र, सध्याच्या घडीला कोरोनाच्या सगळ्यात जास्त केसेस या अमेरिकेत आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण होऊन 1 लाख 30 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना नियंत्रणात आहे अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. मात्र वास्तव हेच आहे की अमेरिकेतली परिस्थिती नियंत्रणात नाही. अमेरिका, भारत यांच्यासह जगातल्या प्रमुख देशांना या रोगाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.