चीननं काढला वचपा, अमेरिकेच्या ‘या’ अधिकार्‍यांच्या आणि नेत्यांच्या Visa वर लावला ‘बॅन’

बिजिंग : अमेरिकेने चीनच्या अनेक अधिकार्‍यांविरोधात कथित मानवाधिकाराच्या उल्लंघनावरून लावलेल्या प्रतिबंधानंतर चीनने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत सोमवारी अमेरिकेच्या काही प्रमुख अधिकार्‍यांवर व नेत्यांवर वीजा प्रतिबंध लावला. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, अमेरिकन अधिकारी आणि नेत्यांचे वागणे आणि उइगर मुस्लिम बहुल प्रांत शिनजियांगच्या काही अधिकार्‍यांविरोधात वीजा प्रतिबंध लावल्याने चीन-अमेरिका संबंधांचे गंभीर नुकसान झाले आहे. याचा निषेध केला पाहिजे. हुआ यांनी अमेरिकेने नजियांग प्रांताच्या तीन अधिकार्‍यांविरोधात अमेरिकन प्रतिबंधाबाबत हे वक्तव्य केले.

अमेरिकेने उइगर मुस्लिमांच्या मानवाधिकार उल्लंघानाच्या आरोपावरून ही कारवाई केली आहे. चीनने अमेरिकन सीनेटर मार्को रुबिओ आणि टेड क्रूज यांच्यासह धार्मिक स्वतंत्र्यासंबंधी अमेरिकन राजदूत सॅमुअल ब्राउनबॅक आणि काँग्रेस सदस्य क्रिस स्मिथ यांच्याविरोधात प्रतिबंध लावले आहेत. यासोबतच चीनने अमेरिकन काँग्रेस कार्यकारी आयोगाच्या (सीईसीसी) विरोधात सुद्धा प्रतिबंध लावले आहेत. सीईसीसी प्रमुख रुबिओ हे चीनचे प्रमुख टिकाकार आहेत.

अमेरिकन अधिकार्‍यांच्या विरोधात प्रतिबंधांची घोषणा करताना हुआ यांनी म्हटले की, शिनजियांग पूर्णपणे चीनचे अंतर्गत प्रकरण आहे, आणि अमेरिकेला यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. चीनचे सरकार आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासह दहशतवाद, फुटीरतावाद आणि जहाल धार्मिक शक्तींविरोधात कारवाई करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. चीन स्थितीच्या आधारे पुढील पावले उचलेल. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा चीनने शिनजियांग, तिबेट आणि नुकतेच हाँगकाँग संबंधी नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यावरून अमेरिकेच्या प्रतिबंधाला उत्तर देताना प्रमुख अमेरिकन राजकीय नेत्यांवर प्रतिबंध लावला आहे.

प्रथम अमेरिकेने लावला प्रतिबंध
यापूर्वी अमेरिकेने चीनच्या मुस्लिम बहुसंख्यांक शिंजियांग प्रांतात उइगुर समजाचे लोक, कजाख तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या अन्य लोकांच्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप करत चीनच्या तीन वरिष्ठ अधिकार्‍यांवर प्रतिबंध लावला. सोबतच त्यांच्या वीजावरही प्रतिबंध लावला. या अधिकार्‍यांमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा एक प्रदेश प्रमुखसुद्धा सहभागी आहे. चीनवर संसाधन संपन्न उत्तर पश्चिम प्रांतात उइगुर समाजाच्या लोकांना सामुहिक पद्धतीने अटकेत ठेवणे, धार्मिक छळ आणि जबरदस्तीने नसबंदी करणे, असे आरोप आहेत.

काय म्हणाले, माइक पोम्पिओ
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी प्रतिबंधाबाबत केलेल्या वक्तव्यात, तीन वरिष्ठ अधिकारी शिंजियांग उइगर स्वायत्त क्षेत्राचे कम्युनिस्ट पार्टी सचिव आणि शक्तिशाली पॉलिट ब्यूरोचे सदस्य चेन क्वांगो, शिंजियांग मुत्सद्दी आणि कायदा समितीचे पार्टी सचिव झू हेइलुन आणि शिंजियांग सार्वजनिक सुरक्षा ब्यूरोचे पार्टी सचिव वांग मिंगशान यांच्या नावांचा सहभाग आहे. अमेरिकेने उचललेल्या या पावलांमुळे हे अधिकारी आणि त्यांची कुटुंबिय अमेरिकेत प्रवेश करू शकणार नाहीत. या सर्वांच्या सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार अमेरिकेच्या गुन्हे कक्षेत येतील आणि अमेरिकेत त्यांची संपत्ती जप्त केली जाईल.