‘कोरोना’ वॅक्सीन बनवण्यात चीन सर्वात पुढं, 19 पैकी 8 औषधे ‘ड्रॅगन’चीच

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस पसरवणारा चीन सध्या कोविड-19 ची वॅक्सीन बनवण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे आहे. चीनची औषध कंपनी सायनोवॅक बायोटेक ही चीनची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे, जी या महिन्याच्या अखेरपर्यंत ट्रायलची शेवटची स्टेज पूर्ण करणार आहे.

जेथे संपूर्ण जगात कोरोना व्हायरस वॅक्सीनसाठी संथ गतीने आणि काळजीपूर्वक काम सूरू आहे, तेथे चीनने आपले लष्कर, सरकार आणि खासगी कंपन्यांना औषध बनवण्यासाठी जुंपले आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे 1.15 कोटीपेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत. तर, 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जगभरात मृत्यू झाला आहे. अमेरिकेसारखा मोठा देश खासगी कंपन्यासोबत मिळून वॅक्सीनची रेस जिंकण्याच्या प्रयत्न करत आहे, परंतु चीन मोठे आव्हान देत आहे.

कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने मोठ्या प्रमाणात वॅक्सीनची ट्रायल जगात कुठेही होताना दिसत नाही. चीनला वॅक्सीन बनवून आपली प्रतिमादेखील सुधारायची आहे. मात्र, त्यांची वॅक्सीन सरक्षित आणि उपयोगी असल्याचे चीनला जगाला पटवून द्यावे लागणार आहे.

लष्कर आणि सरकार ज्या दोन वॅक्सीनचे परिक्षण करत आहे, त्याची ट्रायल सर्वप्रथम मिलिट्रीच्या लोकांवर होईल. पीपल्स लिब्रेशन आर्मीचे मेडिकल रिसर्च युनिट या संपूर्ण प्रोजेक्टला लीड करत आहे.

चीनी सैन्याच्या मेडिकल रिसर्च युनिट खासगी औषध कंपनी कॅनसिनोसोबत मिळून कोविड-19 ची वॅक्सीन बनवत आहे. संपूर्ण जगात सध्या 19 वॅक्सीनचे ह्यूमन ट्रायल होत आहे, ज्यापैकी 8 केवळ चीनच्या आहेत.

चीनचे लष्कर, खासगी औषध कंपनी कॅनसिनो आणि सायनोवॅक सोबत मिळून हे औषध बनवत आहे. चीन जगातील कोरोना वॅक्सीनच्या रेसमध्ये पुढे आहे. चीन सरकारने वॅक्सीन लवकर बनवण्यासाठी सायनोफार्म औषध कंपनी आणि सायनोवॅकला फेज-1 आणि फेज-2 ट्रायल एकाच वेळी घेण्यास सांगितले आहे.

चीनची वॅक्सीन बनवण्याची पद्धत असक्रिय वॅक्सीन बनवण्याची आहे. तर, पश्चिमी देश याच्या उलट काम करत आहेत. चीनच्या 8 वॅक्सीन कँडिडेट्सपैकी चार ह्यूमन ट्रायल्समध्ये पोहचलेल्या वॅक्सीन असक्रिय आहेत.

जगभरात वॅक्सीन बनवण्यासाठी प्रसिद्ध डॉ. पॉल ऑफिट यांनी म्हटले की, असक्रिय वॅक्सीन पद्धती प्रमाणित आणि ठोस आहे. जर मला सांगितले तर मी चीनच्या कँडिडेट्सपैकीच एक निवडेन.

चीनी लष्कराच्या मेडिकल रिसर्च युनिटच्या हेड आणि चीनमध्ये वॅक्सीन विकसित करणार्‍या शास्त्रज्ञ चेन वेई यांनी स्वत: सर्वप्रथम कोरोना व्हायरससाठी बनवलेल्या वॅक्सीनचा शॉट घेतला होता. चेन वेई यांच्या टीमने काही वर्षापूर्वी सार्ससाठी सुद्धा वॅक्सीन बनवली होती.