PM मोदी, राष्ट्रपती आणि CJI सह 10 हजार भारतीयांची ‘हेरगिरी’ करतोय चीन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात चीनच्या हेरगिरीविषयी मोठा खुलासा झाला आहे. चीन एलएसी सोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरूद्ध कट रचत आहे. याअंतर्गत पंतप्रधान ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपासून ते सैन्य दलातील अधिकाऱ्यांपर्यंत आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकजण चीनच्या निशाण्यावर आहेत.

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, चीन मोठ्या घटनात्मक पदावरील राजकारणी आणि भारतातील मोक्याच्या जागांवर बसलेल्या अधिकाऱ्यांची हेरगिरी करीत आहे. चिनी कंपनी शेनझान भारतातील सुमारे दहा हजार लोकांवर नजर ठेवते असा दावा या वर्तमानपत्राने केला आहे. या कंपनीचे चीनी सरकार आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी थेट संबंध आहेत. या चिनी कंपनीची सुमारे दहा हजार भारतीयांवर नजर आहे, ज्यामध्ये पंतप्रधानांपासून ते महापौरांचा देखील समावेश आहे.

देशातील अनेक बड्या लोकांच्या नावाचा समावेश

झेनझुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडमार्फत ज्या भारतीयांवर नजर ठेवली जात आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, गांधी परिवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, नवीन पटनायक सारखे मोठे नेते, राजनाथ सिंह-पियुष गोयल सारखे केंद्रीय मंत्री, सीडीएस बिपिन रावत यांच्यासह अनेक मोठे सैन्य अधिकारी आहेत. चीन जवळपास 1350 लोकांची हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे. राजकारण्यांव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू, गौतम अदानीसारखे उद्योगपती, चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, सोनल मानसिंह, राधे मां सारख्या सेलिब्रिटींवर देखील चीनची नजर आहे.

चिनी सरकारशी मिळालेली आहे कंपनी

या वृत्तपत्राच्या अहवालात असेही म्हटले आहे की या संपूर्ण तपासणीसाठी झेनझुआ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीने चीनी सरकार आणि कम्युनिस्ट पक्षासमवेत मिळून ओव्हरसीजचा इन्फॉर्मेशन डेटा बेस तयार केला आहे, त्या अंतर्गत या मिशनचे संपूर्ण काम केले जाते. कंपनीकडून हा डेटा संकलित केला जात आहे, याला चिनी कंपन्यांनी हायब्रिड वॉर म्हटले आहे, ज्यामध्ये एखाद्याची माहिती एकत्रित करण्याचे ध्येय साधले जाते. एकीकडे चीन एलएसीवर भारतात घुसखोरी करून युद्ध भडकवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे तो मोठ्या नेत्यांपासून ते अधिकाऱ्यांवर नजर ठेवून आहे.

चीन या लोकांची हेरगिरी करत आहे

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
सीडीएस बिपिन रावत
मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे
24 मुख्यमंत्री
16 माजी मुख्यमंत्री
350 खासदार
70 महापौर