एक ना 1 भारतीयावर ‘ड्रॅगन’चा ‘वॉच’ ! चीन करतोय ‘हेरगिरी’

नवी दिल्ली : चीनचे अ‍ॅप्स बॅन झाल्यानंतर सुद्धा भारतीयांचा डाटा आणि त्यांची पर्सनल माहिती सुरक्षित आहे का? तर याबाबत सायबर एक्सपर्ट सांगतात की, चीन अजूनही आपले मनसुबे पूर्ण करण्यात यशस्वी होत आहे. आपण स्वत:च आपल्या घरात, रस्ते आणि चौकांमध्ये चीनचे एजंट तैनात केले आहेत. जे सतत आपली छायाचित्रे आणि महत्वाची माहिती बिजिंगपर्यंत पोहचवत आहेत.

हे एजंट कुणी अन्य नसून सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलीस, सुरक्षा एजन्सीज, बँका, रेल्वे, एयरपोर्टवर लावण्यात आलेले हे कॅमेरे आयपी अ‍ॅड्रेसद्वारे सर्व छायाचित्रे आणि डेटा चीनला पोहचवत आहेत.

सायबर एक्सपर्ट अमित दुबे यांनी म्हटले आहे की, देशात सीसीटीव्ही कॅमेरे व इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टमच्या 90 टक्के बाजारावर चीनचा कब्जा आहे. चीनमध्ये तयार करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक वर्षांपासून भारतीय बाजारात विकले जात आहेत. जे चीनचे हॅकर सहज हॅक करू शकतात आणि प्रत्येक क्षणाची माहिती एकत्र करू शकतात.

प्रत्येक गल्ली, प्रभागापर्यंत पोचलेल्या चीनच्या या एजंटपासून वाचणे आता भारतासाठी खुप आवश्यक आहे. मोबाइल अ‍ॅप फोनमधून हटवणे सोपे आहे, पण सीसीटीव्हीपासून सुटका करून घेणे अवघड आहे.

भारतीय बाजारात 80% कॅमेरे चीनमध्ये तयार होतात आणि ते सर्व हॅक करून 24 तास हेरगिरी करणे खुप सोपे आहे. चीनच्या सोबतचे सध्याचे संबंध पाहता, असे म्हटले जात आहे की, चीन या कॅमेर्‍यांना देशाच्याविरूद्ध पुढील हत्यार बनवू शकतो. काही दिवसांपासून तुम्ही पाहात असाल की, देशावर लागोपाठ चीनचे सायबर अटॅक होत आहेत.

दिल्लीतील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक बाजार भागीरथ पॅलेसमध्ये लाखोंच्या संख्येने चीनी कॅमेरे विक्रीसाठी आहेत. कारण ते स्वस्त असतात. एका डिव्हाइसची किंमत 1,200 रूपयांपासून 3,500पर्यंत आहे. हे सर्वच जवळपास चीनमधून येतात. सध्या व्यापारी चीनी माल नको म्हणत असले तरी असलेला माल आणि विक्रि केलेला माल अजूनही ठिकठिकाणी आहेच.

जर तुम्ही सुद्धा अशाप्रकारचे कॅमेरे वापरत असाल तर त्याचे सेफ्टी फीचर पुन्हा एकदा समजून घ्या. घर, ऑफिस, दुकान किंवा कुठेही सीसीटीव्ही लावताना निर्माता आणि सप्लायर्सबाबत माहिती घ्या.

इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाला सांगण्यात आले आहे की, सीसीटीव्ही खरेदी करताना त्याचा निर्माता आणि सप्लायरबाबत माहिती आवश्य घ्या. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हीच तुमची हेरगिरी होण्यासाठी सामान खरेदी करत आहात.

जगभरात चीनच्या सीसीटीव्हीर प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. त्यामुळे भारतालाही आता सतर्क राहावे लागणार आहे. अलिकडच्या काही रिपोर्टनुसार अमेरिकेने म्हटले आहे की, हाईकव्हिजन आणि 19 अन्य कंपन्यांची मालकी चीनकडे आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या सरकारी एजन्सीजने हाईकव्हीजनकडून खरेदी रोखली आहे. हाईकव्हिजन जगातील सर्वात मोठ्या व्हिडिओ सर्व्हिलान्स कंपन्यांपैकी एक आहे जी हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर टूल्सचे उत्पादन करते. चीनचे लष्कर आणि सरकारशी संबंधित असल्याच्या कारणाने काही युरोपीय देशांनी सुद्धा या कंपनीवर प्रतिबंध लावले आहेत.