भारतासमोर झुकला चीन ! बिजिंगने 30 वर्षांत प्रथमच नवी दिल्लीकडून खरेदी केले तांदूळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लडाख सीमेवरील वादानंतर भारताने चीनविरुद्ध एकापाठोपाठ एक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने एकीकडे बिजिंगशी अनेक करार संपुष्टात आणले, तर दुसरीकडे शेकडो मोबाइल अ‍ॅप्सवर बॅन लावून मोठा आर्थिक धक्का दिला. तर भारतीय व्यापार्‍यांनीसुद्धा फेस्टिव्ह सीझनमध्ये चीनला 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झटका दिला. असे असताना जगातील सर्वांत मोठा तांदूळ आयातदार चीनला मागणी संकटामुळे अखेर भारतासमोर झुकावे लागेल आहे. बिजिंगने 30 वर्षांत प्रथमच जगातील सर्वांत मोठ्या निर्यातदार भारताकडून तांदूळ खरेदी केले.

क्वाॅलिटीच्या मुद्द्यावर नकार देत होता चीन

चीन दरवर्षी विविध देशांमधून 40 लाख टन तांदूळ आयात करत आला आहे, परंतु भारताकडून गुणवत्तेच्या मुद्द्यावर तांदूळ खरेदी करण्यास नकार देत होता. अशावेळी तांदळाच्या मागणी संकटामुळे त्याने सुमारे 30 वर्षांनंतर भारतासोबत तांदूळ खरेदीचा व्यवहार केला आहे. विशेष म्हणजे त्याने हा करार अशावेळी केला आहे, जेव्हा दोन्ही देशात सीमावाद उच्च स्तरावर आहे. तांदूळ निर्यात संघटनेचे अध्यक्ष बीवी कृष्ण राव यांनी म्हटले की, चीनने पहिल्यांदा भारताकडून तांदूळ खरेदी केले आहेत. अपेक्षा आहे की, बिजिंग भारतीय तांदळाची चांगली क्वॉलिटी पाहून पुढील वर्षी जास्त तांदूळ आयात करू शकतो.

300 डॉलर प्रतिटनच्या किमतीवर व्यवहार

भारतीय व्यापार्‍यांनी चीनसोबत डिसेंबर-फेब्रुवारी शिपमेंट्ससाठी 1,00,000 टन तुकडा तांदळासाठी व्यवहार केला आहे. राव यांनी सांगितले की, हा व्यवहार सुमारे 300 डॉलर प्रतिटनच्या दराने केला आहे. यावेळी चीनला नेहमी पुरवठा करणारे देश थायलँड, व्हिएतनाम, म्यानमार आणि पाकिस्तानकडे निर्यातीसाठी तांदूळ मर्यादित तांदूळ आहे, तर हे देश भारताच्या तुलनेत सुमोर 30 डॉलर प्रतिटन जास्तीच्या दराने व्यवहार करत होते. 2020 च्या सुरुवातीच्या 10 महिन्यांत भारताची तांदूळ निर्यात 1.19 कोटी टन होती, जी मागच्या वर्षी 83.40 लाख टन होती. अशाप्रकारे भारताची तांदूळ निर्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जानेवारी-ऑक्टोबरमध्येच 43 टक्के जास्त होती.