चीनला मोठा झटका ! एका मिनीटातच झाला रॉकेटचा स्फोट, ‘बिलीबिली’सह 2 सॅटेलाईट ‘नष्ट’

बिजिंग : वृत्तसंस्था – चीनला लागोपाठ झटके बसत आहेत. पहिल्यांदा गलवानमध्ये भारताकडून, नंतर दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेकडून आणि आता चीनला अंतराळातून मोठा झटका बसला आहे. यामुळे चीनचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. चीनचे एक रॉकेट एका मिनिटाच्या उड्डाणानंतर फेल झाले. यानंतर दोन सॅटेलाइट नष्ट झाले. एक सॅटेलाइट व्हिडिओ शेयरिंग साइटसाठी होते. तर दुसरे नेव्हिगेशन सिस्टमसाठी बनवण्यात आले होते.

चीनने गुरुवारी रात्री उशीरा 12.17 वाजता उत्तर-पश्चिम चीनच्या जिउकुआ सॅटेलाइट सेंटरवरून कुआइ झोउ -11 रॉकेट लाँच केले होते. या रॉकेटमध्ये दोन सॅटेलाइट होते. बिलीबिली व्हिडिओ शेयरिंग साइटच्या चांगगुआंग सॅटेलाइट कंपनी लिमिटेडने सॅटेलाइट बनवले होते. चांगगुआंग सॅटेलाइट कंपनी सरकारी संस्था चांगचुन इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टिक्स, फाइल मॅकेनिक्स आणि फिजिक्सचा भाग आहे. ही चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत संचालित होते. दूसरे सॅटेलाइट म्हणजे सेंटीस्पेस-1-एस 2 सुद्धा नष्ट झाले. यास विली-1-02 सॅटेलाइट सुद्धा म्हणतात. हे एक लो-अर्थ ऑर्बिट नेव्हिगेशन सॅटेलाइट होते. हे दूरसंचारसाठी आहे. हे बिजिंग फ्यूचर नेव्हिगेशन टेक्नोलॉजी कंपनी लिमिटेडने बनवले होते. कुआईझोउ-11 रॉकेट प्रोजेक्ट 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता. 2019 मध्ये या रॉकेटच्या पहिल्या स्टेजमध्ये परीक्षणादरम्यान ब्लास्ट झाला होता. चीनचे हे यावर्षातील 19वे लाँच होते, जे वाईट पद्धतीने फेल झाले आहे.

यावर्षी चीनची तीन रॉकेट फेल झाली आहेत. पहिले मार्चमध्ये झाले होते. याचे नाव लॉन्ग मार्च 7ए रॉकेट होते. दुसरे एप्रिलमध्ये फेल झाले होते. त्याचे नाव लॉन्ग मार्च 3बी होते. या रॉकेटसोबत इंडोनेशियाचे पालापा-एन1 कम्यूनिकेशन सॅटेलाइट सुद्धा नष्ट झाले होते. चीन कुआईझोउ-11 रॉकेटद्वारे कॉमर्शियल लाँचिंगचा बादशाह बनू इच्छित होता. जगभरात कमर्शियल लाँचिंगमध्ये नंबर एक आणि सर्वात विश्वासू देश भारत आहे. भारत जगातील डझनभर देशांचे सॅटेलाइटचे यशस्वी लाँचिंग करतो. परंतु, यामध्ये भारताला मागे टाकण्याची चीनची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. चीनमध्ये सध्या अनेक खासगी कंपन्या स्पेस लाँच मिशनमध्ये सहभागी आहेत. परंतु, कुणालाही मनासारखे यश मिळालेले नाही. या कंपन्यांमध्ये एक्सपेस, आयस्पेस, वनस्पेस आणि लँडस्पेस या प्रमुख कंपन्या आहेत. सध्या हे लाँच फेल झाल्यानंतर चीनच्या सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जेणेकरून समजावे की, अखेर चूक कुठे झाली आणि कुणाकडून झाली होती.