चीननं बनवला जगातील सर्वात उंच ‘ब्रीज’, एकाच वेळी धावणार ‘रेल्वे’ अन् ‘कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन जेव्हा काही बनवते ते अदभूत अवाढव्य असते. आता चीनने जगातील सर्वात मोठा पुल बनवला आहे, जो नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सामान्य लोकांसाठी खुला करण्यात येईल. यावर वाहनं आणि रेल्वे एकत्र धावू शकतील. कारण हा पुल डबल डेकर आहे.

या अदभूत उंचीच्या पुलाचे नाव आहे पिंगटांग ब्रिज. याचा मेन टॉवर 332 मीटर उंच आहे, म्हणजेच जवळपास 1090 फूट आहे. या पुलाला तीन टॉवर आहेत. हा टॉवर केबलच्या आधारे जोडला गेला आहे.

लांबी 2,135 मीटर –
पिंगटांग पुल गुईझोउ प्रांतच्या काओडू नदीच्या घाटावर आहे. हा पुल पिंगटांग आणि लुओडियान एक्सप्रेस वे ला जोडलेला आहे. याची लांबी 2,135 मीटर आहे. म्हणजेच 2.13 किमी. याच्या दोन्ही बाजूंना सुरुंग आहेत आणि ते एक्सप्रेस वेच्या पुलाला जोडलेले आहेत.

यावर चालणार हायस्पीड रेल्वे –
या पुलावर पिंगटांग आणि लुओडियान दरम्यान हायस्पीड रेल्वे चालेल. या रेल्वेमुळे पिंगटांग आणि लुओडियान दरम्यानचे अंतर अडीच तास कमी होऊन एक तास होईल. या हायस्पीड रेल्वेच्या रुळाची लांबी 7000 किलोमीटर आहे.

गुईझोउ प्रांत पुलांचे म्यूझिअम आहे, या प्रांतात 20 हजार पेक्षा जास्त पुल आहेत. कारण हा पूर्ण प्रांतच डोंगरावर आहे. वाहतूकीसाठी लहान मोठे अनेक पुल आहेत. जगातील सर्वात मोठे 100 पुल आहेत ज्यातील 46 पुल गुईझोउमध्ये आहेत. यासाठी जगभरातील गुईझोउला पुलांचे म्यूझिअम म्हणले जाते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/