Coronavirus : चीनमध्ये ‘कोरोना’ व्हायरसवरून मोठा खुलासा, फक्त ‘या’ कारणामुळं झाला अनेकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हेंटिलेटर मिळण्यास उशीर झाल्याने चीनमध्ये बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला आहे. एका अभ्यासानुसार, चीनमध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे मृत्यू झालेल्यांपैकी केवळ 20 टक्के लोकांना यांत्रिकी व्हेंटिलेटरची सुविधा मिळू शकली आहे. वेंटिलेटर प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. प्रथम यांत्रिक व्हेंटिलेटर आणि दुसरे नॉन-इनव्हेसिव व्हेंटिलेटर. यांत्रिक व्हेंटिलेटरची नळी रुग्णाच्या श्वास नलीकेशी जोडलेली असते, जी फुफ्फुसांना ऑक्सिजन देते. दुसऱ्या प्रकारचे व्हेंटिलेटर श्वास नलीकेशी जोडलेले नसते, त्याऐवजी तोंड व नाकाला कव्हर करुन एक मास्क लावला जातो ज्याद्वारे ही प्रक्रिया चालविली जाते.

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात वुहानमधील 21 रुग्णालयांचे मूल्यांकन केले गेले आहे. 21 ते 30 जानेवारी दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी केवळ 168 रूग्णांना श्वास घेण्यास मदत केली गेली. साउथईस्ट विद्यापीठातील रुग्णालयाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रूग्णांना ऑक्सिजन थेरपी दिली गेली असली तरी केवळ 46 रूग्णांना मरण्याआधी नाक किंवा फेस मास्कद्वारे ऑक्सिजन देण्यात आले. ते म्हणाले की, एक तृतीयांश रूग्णांना हाय फ्लो नेजल ऑक्सिजन थेरपी दिली गेली, तर 72 रुग्णांना नॉन-इनव्हेसिव व्हेंटिलेशन दिले गेले. या अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की, केवळ 34 रुग्णांना नळीतून ऑक्सिजन किंवा यांत्रिक व्हेंटिलेशन दिले गेले.

जगाला कोरोनाच्या संकटात अडकवणाऱ्या चीनमध्ये कोरोना विषाणूची 46 नवीन प्रकरणांसोबत संक्रमित रुग्णांची एकूण आकडेवारी 81,953 वर पोचली आहेत, त्याचबरोबर आणखी तीन लोकांच्या मृत्यूबरोबर मृतांची संख्या वाढून 3,339 झाली आहे. नॅशनल हेल्थ कमिशन ऑफ चाइना (एनएचसी) च्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये अजूनही 1,089 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तथापि, उपचारानंतर 77,525 लोकांना सुट्टी देण्यात आली आहे. साथीच्या रोगाचा सर्वाधिक त्रास झालेल्या हुबेई प्रांतात प्रकरणे थांबली आहेत. मात्र, नव्या प्रकरणांच्या वाढीमुळे सरकारचा ताण वाढला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कामाच्या ठिकाणी कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.