Coronavirus Vaccine : ‘या’ 3 मोठ्या कारणांमुळे चीनची ‘कोरोना’ वॅक्सीन सर्वप्रथम होऊ शकते ‘यशस्वी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने अनेक पाश्चिमात्य देशांची कमजोरी उघड केली आहे. ते या महामारीत अतिशय वाईट स्थितीला तोंड देत आहेत. तर, पश्चिमेतील बहुतांश देशांना ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या वॅक्सीनकडून अपेक्षा होती, परंतु नुकतीच या वॅक्सीनची ट्रायला रोखण्याची वेळ आली. मात्र, सध्या ही ट्रायल पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. दुसरीकडे, चीन वॅक्सीन तयार करत आहे आणि वॅक्सीनच्या कुटनीतीमध्ये सुद्धा सर्वात पुढे दिसत आहे. अनेक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चीन वॅक्सीनची रेस जिंकण्यात यशस्वी होऊ शकतो.

ब्रिटिश टेलिग्राफमध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार, प्रथमच अन्य देशांचे सायंटिस्ट आता या थेअरीवर गांभिर्याने विचार करत आहेत की, पहिली वॅक्सीन चीनची असू शकते. अनेक देशांचे मुत्सद्दी यावर विचार करत आहेत की, जर चीनने वॅक्सीन तयार केली तर यामुळे जगाचे राजकारण कसे बदलेल.

चीन या तीन कारणांमध्ये वॅक्सीनची रेस जिंकू शकतो
1. फेज 3 ट्रायलमध्ये सर्वात जास्त चीनी वॅक्सीन कँडिडेट आहेत. जगात सध्या 9 कोरोना वॅक्सीन फेज-3 ट्रायलमध्ये पोहचल्या आहेत. यापैकी चीनच्या 4 आहेत.
2. चीन वॅक्सीन बनवण्यासाठी जुने आणि विश्वासू तंत्रज्ञान वापरत आहे.
3. चीनने अनेक देशांच्या अगोदर आपल्या वॅक्सीनची फेज-3 ट्रायल सुरू केली होती.

विेशेषकरून पाश्चिमात्य देशांसाठी वॅक्सीन तयार करत असलेल्या कंपन्यांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, तर चीन ओल्ड स्कूल वॅक्सीन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. एक्सपर्ट विचार करत आहेत की, वॅक्सीन तयार करण्याची जुनी पद्धत यशस्वी झाली तर?

बायोमेडिकल थिंक टँक पॉलिसी क्युअर रिसर्चचे टेक्निकल हेड डॉ. विपुल चौधरी म्हणतात, चीनच्या तीन ते चार वॅक्सीन कँडिडेट इनअ‍ॅक्टिव्हेटेड सार्स-कोव्ह-2 व्हायरसचा वापर करत आहेत, जे सर्वात चांगले ठरू शकते. चीनने अँटीजन गुणांना सोडून व्हायरसला डिसेबल केले आहे. ही वॅक्सीन तयार करण्याची पारंपारिक पद्धत आहे.

अमेरिकेच्या एका हॉस्पीटलमधील वॅक्सीन एज्युकेशन सेंटरचे डायरेक्टर डॉ. पॉल ऑफिट म्हणतात, मला इनअ‍ॅक्टिव्हेटेड वॅक्सीन कँडिडेटबाबत जास्त सहजता जाणवते. कारण आपल्याकउे अशा वॅक्सीनचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सीनद्वारे आपण केवळ स्पाइक प्रोटीन विरूद्धच नव्हे तर सर्व 4 कोरोना व्हायरस प्रोटीनच्याविरूद्ध इम्यून रिस्पॉन्स निर्माण करतो.

तर, चीनी कंपनी चायना नॅशनल बायोटेक ग्रुपने म्हटले आहे की, त्यांच्या वॅक्सीनचे फेज 3 ट्रायलचे सुरूवातीचे रिझल्ट खुप चांगले आहेत. लाखो लोकांना वॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे, यापैकी एकाही व्यक्तीमध्ये रिअ‍ॅक्शन दिसले नाही आणि कुणीही कोरोना संक्रमित झाले नाही. कंपनीच्या दोन वॅक्सीन 3 वर्षापर्यंत सुरक्षा प्रदान करतात.