आता ‘हात’ न लावता तुम्ही वापरु शकतात तुमचा ‘स्मार्टफोन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोज स्मार्टफोनच्या तंत्राज्ञानात बदल होत असतो. आता ही नव्या तंत्रज्ञानाची भर यात पडली आहे. यापुढे तुमचा फोन वापरण्यासाठी ना की तु्म्हाला त्याला हात लावयची गरज आहे आणि ना की वॉईस देऊन मोबाईल नियंत्रित ठेवण्याची.

चीनमध्ये झालेल्या संशोधनात एक नवी बाब समोर आली आहे. चीनमध्ये स्मार्टफोन वापण्यासाठी एक चिप बनवण्यात आली आहे जी तुमच्या डोक्यात चाललेले विचार समजून घेऊन तुमचा स्मार्टफोन नियंत्रित करेल.

आताच चीनमध्ये झालेल्या एका जागतिक इंटेलिजंस काँग्रेसमध्ये ही आनोखी चिप प्रदर्शित करण्यात आली. ज्यानंतर आता शक्यता वर्तवली जात आहे की येणाऱ्या दिवसात आपले स्मार्टफोन आधिक स्मार्ट होतील. या चिपला ‘ब्रेन टॉकर’ नाव देण्यात आले असून ती आपल्या डोक्यातील विदयुत तरंगाच्या मदतीने काम करेल. याला संगणकाद्वारे डीकोड करण्यात येऊ शकते. ही चिप तियानजिन युनिवर्सिटी आणि चायना इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन यांनी मिळून तयार केली आहे.

या चिप बद्दल संशोधकांनी दावा केला आहे की, या चिपने संगणक, स्मार्टफोन आणि इतर डिवाईसवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. या तंत्रज्ञानामुळे आरोग्य, शिक्षण, मनोरंजन आणि सुरक्षा या क्षेत्रात आधिक प्रगती होऊ शकते. या क्षेत्रात आधिक व्यापकपणे याचा वापर होऊ शकतो.

चिप बणवणाऱ्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, ज्या पद्धतीने आपण विचार करु त्याच प्रकारे ही चिप प्रतिक्रिया देईल आणि संबंधित डिवाईसला नियंत्रित करेल.

You might also like