Coronavirus : जगभरात ‘कोरोना’ व्हायरस पसरविल्याच्या आरोपावर चीननं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असून एकीकडे त्याच्या उत्पत्तीबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत. हा जीवघेणा व्हायरस नक्की आला कुठून? अमेरिका या व्हायरसला जगभरात पसरण्यासाठी चीनला दोषी ठरवत आहे. तर उलट चीनही अमेरिकेला या व्हायरसच्या पसरण्याबाबत दोषी ठरवत आहे. यादरम्यान आता चीनने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे की, ना त्यांनी या व्हायरसला बनवले आणि ना त्यांनी या व्हायरसला इतर देशात पसरवले.

चीनने म्हटले की, ‘कोरोना व्हायरसची निर्मिती चीनने केलेली नाही आणि ना त्याला जाणूनबुजून प्रसारित केले आहे. या व्हायरसला चिनी व्हायरस किंवा वुहान व्हायरस शब्दांचा उपयोग करणे चुकीचे आहे.’ चीन दूतावासाचे प्रवक्ता जी रोंग यांनी म्हटले की, ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनच्या लोकांवर टीका करण्याऐवजी या महामारीच्या उपायाकडे लक्ष दिले पाहिजे.’

तसेच त्यांनी या व्हायरसशी लढण्याच्या प्रयत्नांबाबत भारत आणि चीनमधील सहकार्याबाबत म्हटले की, दोन्ही देशांनी संवाद साधत संकटकाळात महामारीचा सामना करण्यासाठी एकमेकांना मदत केली आहे. ते म्हणाले कि भारताने चीनला वैद्यकीय मदत केली आहे. अनेक प्रकारच्या संघर्षाविरुद्ध त्यांच्या लढ्यामध्ये मदत केली आहे. यासाठी आम्ही भारताचे कौतुक करतो आणि आभार मानतो.

डब्ल्यूएचओच्या विधानाला उत्तर देत रोंग म्हणाले की, ‘जागतिक आरोग्य संघटनेनेही ठामपणे म्हटले आहे कि चीन आणि वुहानशी या व्हायरसचा संबंध जोडणे योग्य नाही. जे लोक मानवजातीसाठी केल्या गेलेल्या या चीनच्या प्रयत्नांना कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा ठेवण्यात केल्या गेलेल्या चीनच्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले आहे.’