PUBG सह 118 अ‍ॅप्सवर बंदी आणल्यानं चीन ‘सैरभैर’, भारताला चूक सुधारण्यास सांगतोय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमधील सीमावाद चांगलाच उफळलेला दिसतोय. बुधवारी भारताने चीनचे पबजीसह 118 ऍपवर बंदी घातली होती. सीमेवर चिनी सैन्यासह वाढत्या संघर्षामुळे भारताने या ऍपवर बॅन करून चीनवर आणखी एक ‘डिजिटल स्ट्राइक’ केला आहे.

बुधवारी भारत सरकारने 118 चिनी मोबाइल ऍपवर बंदी घातली असून यापूर्वीही चीनच्या 59 ऍपवर बंदी आणली होती. यात PUBG सह Baidu, कॅमकार्ड बिजनेस, वीचॅट रीडिंग, वूव मीटिंग- टेनसेंट वीडियो कॉन्फ्रेंसिंग, स्मार्ट ऐप लॉक, ऐपलॉक सारख्या ऍपचा समावेश आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयानंतर चीन आता चांगलाच संतापला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने भारत सरकारच्या या निर्णयाला कडक विरोध दर्शविला आहे आणि भारतला आपली चूक सुधारण्यासही सांगितले आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की ते चीनचे मोबाइल अॅप बंद करण्याच्या भारताच्या निर्णयाला तीव्र विरोध करते. या निर्णयामुळे चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हक्काचे उल्लंघन झाले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग म्हणाले की, चीन भारताला आपली चूक सुधारली पाहिजे.

चिनसोबतचा वाढलेला तणाव, जागतिक महामारी कोरोनाचे वाढते रुग्ण आणि बेरोजगारी हे मुद्दे सध्या भारताच्या समोर आव्हाने म्हणून उभी आहेत.