Coronavirus : चीननं ‘काटेकोर’पणे अन् ‘नियोजन’बध्द पध्दतीनं ‘कोरोना’वर मिळवलं ‘कंट्रोल’, ‘असा’ होता संपूर्ण प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोविड 19 चा पहिला रुग्ण 20 डिसेंबर 2019 मध्ये वुहानमध्ये आढळला होता. सुरुवातीला हा सामान्य आजार किंवा ताप मानला गेला आणि रुग्णांना तीन दिवस अँटीबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला गेला. परंतु या आजाराने मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णांचे शवविच्छेदन करण्यात आले, तेव्हा त्यांच्या अहवालात एक नवा व्हायरस समोर आला, जो अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात आले.

चीनला जेव्हा कळाले की या संसर्ग जण्या आजाराचे कोणतेही औषध नाही तेव्हा त्यांनी हा व्हायरस जगभरात पसरु शकतो अशा सूचना दिल्या आणि सहकार्य देखील मागितले. 160 देश सध्या कोरोना व्हायरस रोखण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी चीनने उचलली महत्वाची पावले –
– चीनने यासाठी 1000 खाटांचे रुग्णालय वुहानमध्ये तयार केले. त्यानंतर असेच 1000 खाटांचे 13 हॉस्पिटल तयार करण्यात आले. यासह 50 मिलियन लोकांनी वुहानमध्ये एकटे राहण्याचा सल्ला दिला. चीनने एमरजेंसी मेडिकल रिस्पाॅंस स्ट्रॅटेजी तयार केली परंतु त्यात त्यांना यश आले नाही. ज्यानंतर मिलिट्री मेडिकल रिस्पाॅंस स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली.

सुरक्षा आणि रस्तेबंद करण्यासाठी चीनने लागू केला MMRS –
याअंतर्गत कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले. यासाठी क्वारंटाइन अनेक कॅटेगिरीमध्ये विभागण्यात आली.

1. कम्युनिटी क्वारंटाइन
2. मेडिकल क्वारंटाइन
3. इंटेंसिव केअर क्वारंटाइन
4. क्रिटिकल केअर क्वारंटाइन
चीनने याअंतर्गत 20 लाख डॉक्टर ठेवण्यात आले.

यानंतर 93 टक्के लोकांचा जेव्हा इंटेंसिव्ह केअर क्वारंटाइन अंतर्गत उपचार केला जात होता. त्याअंतर्गत त्यांना दोन आठवड्यात लोअर कॅटेगिरीच्या क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले.

चीनमध्ये सिंगल पार्टी रुल असल्याने त्याअंतर्गत प्रत्येक नागरिकाला कम्युनिस्ट पार्टी आणि सैन्य प्रशिक्षण 30 दिवस घ्यावे लागते. यामुळे तेथील नागरिक SOP म्हणजेच स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मानन्यासाठी बाध्य आहेत. यामुळे चीन कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरत आहे. मेडिकल क्वारंटाइन कॅटेगरीअंतर्गत 93 टक्के लोक ठीक होऊ घरी गेले.

उपचारावेळी मेडिकल स्टाफला देखील झाला कोरोना –
यात 22 टक्के लोक तंदुरुस्त झाल्यानंतर त्यांना लोवर लेव्हल मेडिकल क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले. यात संशयित रुग्णांपैकी 68.5 टक्के रुग्णांना मेडिकल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

SOP अंतर्गत सर्जिकल मास्क, पॅथोजेन्सला काऊंटर करण्यासाठी डॉक्टर्स आणि पॅरामेडिकला खास कपडे देण्यात आले होते. असे असताना देखील रुग्णांवर उपचारादरम्यान 10 टक्के मेडिकल स्टाफला कोरोना झाला होता. रोगींना योग आणि इतर इंडोर गेम्समध्ये व्यस्त ठेवण्यात आले. योग्य रिस्पाॅंस सिस्टमअंतर्गत चीनला कोरोना रोखण्यास यश मिळाले.  फक्त 3 – 4 टक्के लोक CCU/ICU क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले.

चीनमध्ये हस्तांदोलन केल्यास दंडनीय गुन्हा –
3 मार्च 2020 पर्यंत चीनमध्ये 206 कोरोनाचे केस होते तर युरोपात 386 केस होते. चीनमध्ये तर हस्तांदोलन केल्यास दंडनीय गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु शिक्षेचा घोषणा अद्याप करण्यात आली नाही.