कोरोनाच्या दहशतीखाली जग, 135 देशांत पोहचला व्हायरस, सील होत आहेत सीमा, यूएनने दिला ‘हा’ आदेश

बिजिंग : चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. हा धोका टाळण्यासाठी सीमा बंद करणे आणि वाहतुकीवर बंदी आणण्यासारख्या कडक उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या चीनमध्ये या जीवघेण्या व्हायरसच्या प्रकरणात घट झाली आहे, परंतु आता यूरोप याचे केंद्र बनला आहे. जगभरात आतापर्यंत एक लाख 46 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. तर सुमारे 5,500 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक महामारी घोषित झालेला कोरोना व्हायरस सुमारे 135 देशांत पोहचला आहे.

सील होत आहेत बंद
चीनच्या बाहेर कोरोना व्हायरसमुळे इटली आणि इराणमध्ये स्थिती गंभीर आहे. तर यूरोपमध्ये इटलीनंतर स्पेन, फ्रान्स, स्विझर्लंड, ब्रिटेन आणि नेदरलँडमध्येही संसर्ग झाला आहे. या जीवघेण्या व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देश अतिशय कडक उपाय योजना करताना दिसत आहेत. कोलंबियाने म्हटले आहे की, तो आपली वेनेझुएला लगतची आपली सीमा बंद करणार आहे. यूरोप आणि आशियातून येणार्‍यांवर प्रतिबंध लावण्यात येईल. अमेरिकेने शुक्रवारी मध्यरात्रीपासून यूरोपीय देशांच्या नागरिकांच्या येण्यावर प्रतिबंध घातला आहे. तैवानने सुद्धा युरोपहून येणार्‍या लोकांसाठी 14 दिवसांचे आयसोलेशन बंधनकारक केले आहे.

इराणमध्ये एका दिवसात 97 मृत्यू
न्यूझीलँडने सुद्धा अशीच पावले उचलली आहेत. या देशाने 30 जूनपर्यंत क्रूझ जहाजांना बंदी घातली आहे. चिलीची राष्ट्रपती सेबेस्टियन पिंनेरा यांनी 500 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाने सुद्धा मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात कोरोना व्हायरसमुळे 97 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात हे सर्वाधिक मृत्यू आहेत. यामुळे मृत्यूंची संख्या वाढून 611 झाली आहे. आतापर्यंत 12,729 जणांमध्ये संसर्ग आढळून आला आहे.

नेपाळने सुद्धा केली परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी
कोरोना व्हायरसमुळे नेपाळने सुद्धा परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली आहे. शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून ही बंदी सुरू झाली आहे. सध्या हा प्रतिबंध 30 मार्चपर्यंत आहे. नेपाळच्या या निर्णयामुळे भारत-नेपाळ सीमा परदेशी नागरिकांसाठी सील झाली आहे. भारतीय नागरिकांना या प्रतिबंधातून मुक्त ठेवण्यात आले आहे. नेपाळचे अधिकारी गिरिराज खनाल यांनी ही माहिती दिली.

जगाची अशी आहे स्थिती
– पाकिस्तानने अफगानिस्तान आणि इराणच्या लगतच्या सीमा बंद केल्या. सर्व गर्दीचे कार्यक्रम रोखले.

– सौदी अरबने म्हटले, संसर्ग रोखण्यासाठी रविवारीपासून सर्व अंतरराष्ट्रीय उड्डाणे रोखणार.

– फिनिपिन्समध्ये रात्री कर्फ्यू लावणे आणि शॉपिंग मॉल एक महीन्यांसाठी बंद करण्याची तयारी.

– इटलीत प्लेग्राऊंड अणि पार्कसुद्धा बंद केले, बहुतांश व्यापार, सिनेमा, पब, रेस्टॉरन्ट, संग्रहालय अगोदरपासूनच बंद.

– व्हिएतनाम युरोपहून येणार्‍या प्रवाशांवर बंदी घालणार आणि रविवारपासून पर्यटक वीज जारी करणार नाही.

– इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये दोन आठवड्यासाठी सर्व शाळा बंद.

– नार्वेने आपल्या नागरिकांना एक महिन्यापर्यंत परदेश दौरा करू नये, असे सांगितले.

– रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये सोमवारपासून विद्यार्थ्यांना शाळेतील उपस्थिती एैच्छिक.

ब्रिटेनमध्ये स्थानिक निवडणुका स्थगित
ब्रिटिश सरकारने सात मे रोजी होणार्‍या मेयर पदाच्या स्थानिक निवडणुका स्थगित केल्या आहेत. कोरोना व्हायरसवर अंकुश लावण्यासाठी गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच अनेक कडक पावले उचलण्यात आली आहेत.

यूएन मुख्यालयाच्या स्टाफने घरून काम करावे : गुतेरस
संयुक्त राष्ट्र (यूएन) महासचिव एंटेनियो गुतेरस यांनी मुख्यालयाच्या सर्व स्टाफला आदेश दिला आहे की, त्यांनी टेलिफोन, इंटरनेट किंवा ईमेलद्वारे घरूनच काम करावे. यूएनचे एका अधिाकार्‍याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.

कॅनडात संसद बंद, क्वारंटाईनमध्ये ट्रूडो
कॅनडाची संसद बंद करण्यात आली आहे. लोकांना सल्ला देण्यात आला आहे की, विनाकारण प्रवास करू नये. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची पत्नी सोफी ग्रेगोर यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यामुळे दोघे क्वारंटाईनमध्ये आहेत. ट्रूडो यांची प्रकृती निरोगी असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्पेनमध्ये 1500 नवी प्रकरणे
युरोपमध्ये इटलीनंतर सर्वात जास्त प्रभावित स्पेनमध्ये एका दिवसात 1500 पेक्षा जास्त नवीन प्रकरणांना दुजोरा मिळाला आहे. सरकारने म्हटले आहे की, व्हायरस रोखण्यासाठी नवीन पावले उचलली जातील.

सर्वाधिक प्रभावित देश

देश – मृत्यू – संसर्ग

चीन – 3189 – 80,824

इटली – 1266 – 17,660

इराण – 611 – 12,729

स्पेन – 129 – 5232

दक्षिण कोरिया – 72 – 8086

फ्रान्स – 79 – 3661

अमेरिका – 47 – 2287

जपान – 28 – 1423

ब्रिटेन – 11 – 798

नेदरलँड -10 -904

लंडनमध्ये नवजात बाळाला लागण
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये एका नवजात बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. हे संक्रमण झालेले हे सर्वात कमी वयाचे पहिले प्रकरण आहे. डॉक्टर याच शोध घेत आहेत की, नार्थ मिडलसेक्स हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या या बाळाला संसर्ग कसा झाला. चीनमध्ये गत महिन्यात जन्मलेल्या एका बाळाला लागण झाली होती.