‘कोरोना’दरम्यान चीनला वाढवायचीय लोकसंख्या; जास्त मुलांना जन्म देण्यासाठी देऊ लागला जोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान चीन आता आपली लोकसंख्या वाढवण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. देशात मुलांच्या जन्माला प्रोत्साहन देण्याचे नवीन धोरण बनवले जात आहे. चीनच्या सरकारी मीडियानुसार, चीनमध्ये ज्येष्ठांची लोकसंख्या वाढत आहे आणि याच समस्येवर मार्ग काढण्यासाठी मुलांना जन्म देण्यावर जोर देण्याचे काम सुरू केले जात आहे.

चायना डेलीच्या रिपोर्टनुसार, देशात ज्येष्ठांची संख्या वेगाने वाढत आहे. तर, अन्य देशांप्रमाणे चीनसुद्धा आतापर्यंत कोरोना महामारीतून मुक्त झालेला नाही. परंतु अधिकृत आकड्यांनुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत केवळ 4634 लोकांचा मृत्यू झाला आहे.

चिनी मीडियाच्या रिपोर्टनुसार, आता चीन त्या कपल्सला आर्थिक मदत देणार आहे, जे जास्त मुलांना जन्म देतील. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, चायना पॉप्युलशेन असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट युआन जीन यांचे म्हणणे आहे की, लोकसंख्येशी संबंधित आणखी चांगले धोरण सादर केले जाईल, जेणेकरून फर्टिलिटी चांगली व्हावी.

जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या असूनही चीन यासाठी मुलांना जन्म देण्यावर जोर देत आहे, जेणेकरून पुढे जाऊन देशात तरुणांची कमतरता भासू नये. कारण चीनमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढण्याचा वेग खूपच जास्त आहे. चीनला आपल्या देशाच्या लोकसंख्येत सर्वच वयाच्या लोकांची संख्या चांगली ठेवायची आहे. मागील वर्षाच्या अखेरीस 60 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या चीनमध्ये 18.1 टक्के होती.

1978 मध्ये चीनने एक एक जोडपे एक मूल या धोरणाची घोषणा केली होती. या धोरणाचे उल्लंघन करणार्‍या जोडप्याला दंड लावला जात होता आणि त्यांना रोजगारापासूनसुद्धा वंचित ठेवले जात होते. अनेकदा जबरदस्तीने अबॉर्शनसुद्धा केली जात होती. तेव्हा चीनचे लक्ष्य होते देशातील गरिबी कमी करणे, कारण चीनची लोकसंख्या वेगाने वाढत होती. 2015 मध्ये चीनने या धोरणात सूट देण्याची घोषणा केली होती.