दोन्ही देशांच्या बैठकीत चीननं उपस्थित केला 59 ‘चिनी अ‍ॅप’वर बंदी घातल्याचा मुद्दा, भारतानं दिलं चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. अलीकडेच दोन्ही देशांदरम्यान झालेल्या बैठकीत चीनने चिनी अ‍ॅपवर बंदी आणण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर म्हणून भारत सरकारने म्हटले की अ‍ॅपवर बंदी घातली गेली आहे याचे कारण फक्त आणि फक्त देशाच्या अंतर्गत सुरक्षा हे आहे.

सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की मुत्सद्दी पातळीवर दोन्ही देशांमधील बैठकीदरम्यान चिनी बाजूने मोबाइलवरील 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मुद्दा उपस्थित केला. सूत्रांनी सांगितले की, भारतीय बाजूने चीनला हे स्पष्ट केले आहे की सुरक्षेच्या प्रश्नांचा विचार करता ही कारवाई केली गेली आहे आणि भारतीय नागरिकांशी संबंधित आकडेवारीत छेडछाड होऊ नये यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

टिकटॉक, वीचॅट आणि यूसी ब्राउझरवर देखील घातली बंदी

भारताने अलीकडेच 59 चीनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, ज्यात देशाच्या सार्वभौमत्वाची आणि सुरक्षिततेची दखल घेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की टिकटॉक, वीचॅट, हेलो आणि यूसी ब्राउझर सहित इतर अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. चीनी कंपन्या या अ‍ॅप्सद्वारे डेटा संकलित करत आहेत आणि त्यांना बाहेर पाठवत आहेत ही माहिती गुप्तचर संस्थांकडून मिळाल्यानंतर भारत सरकारने 29 जूनच्या आदेशात बहुतेक अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

कलम 69 ए अंतर्गत निर्बंध लादले

या 59 चिनी अ‍ॅप्सवर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत बंदी घातली गेली आहे, जी माहिती तंत्रज्ञानाच्या संबंधित तरतुदींशी संबंधित आहे. 59 चीनी अ‍ॅप बंदीनंतर चिनी परराष्ट्र मंत्रालयाने अशी प्रतिक्रिया दिली की आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे हे भारताचे कर्तव्य होते.