काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा देण्याबाबत चीननं दिलं आश्‍वासन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या आपल्या कटिबद्धतेची पुन्हा एकदा चीनने पुनरावृत्ती केली आणि असे म्हटले की, प्रादेशिक परिस्थिती जटिल बनविणार्‍या कोणत्याही एकतर्फी कारवाईला त्यांनी विरोध दर्शविला असे दोन्ही देशांनी सामायिक निवेदनाद्वारे सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे परराष्ट्रमंत्री आणि स्टेट काऊन्सिलर वांग यी यांच्या पाकिस्तानच्या दोन दिवसीय दौर्‍याची सांगता झाल्यानंतर रविवारी हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.

त्यांच्या भेटीदरम्यान, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान इम्रान खान, त्यांचे समकक्ष शाह महमूद कुरेशी, अध्यक्ष आरिफ अल्वी आणि लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली.

“पाकिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या बचावासाठी चीनने पाठिंबा दर्शविण्याबरोबरच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांना पाठिंबा देण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला,” असे निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तान दौर्‍यावर आलेल्या चीनी प्रतिनिधींनी सांगितले की, काश्मीरमधील सद्यस्थितीकडे चीनचेही लक्ष आहे. हा मुद्दा “ऐतिहासिक काळापासून सुरु असलेला वाद आहे ज्यावर तोडगा निघालेला नाही.” युएन सुरक्षा परिषदेच्या ठरावांच्या आधारे हा वाद द्विपक्षीय आणि शांततेने सोडविला जावा, असे चीनने म्हटले आहे.

 

You might also like