काय सांगता ! होय, जगातील 180 देश बनले चीनचे मित्र, बनवले राजनैतिक संबंध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेला चीन सतत सुपर पॉवरचा दर्जा वाढवत आहे. या दरम्यान चीनशी राजनैतिक संबंध असलेल्या देशांची संख्या १८० वर पोहोचली आहे. चायना रेडिओ इंटरनॅशनलच्या हवाल्यानुसार १९४९ ते २०१९ दरम्यान ७० वर्षात चीनने जगातील ९० टक्के पेक्षा जास्त देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत.

इतकेच नाही तर गेल्या ४० वर्षांत चीनमधील एक सिद्धांत आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र मान्य झाला आहे. आतापर्यंत जगातील १९५ राष्ट्रांपैकी १८० देशांनी चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. अलीकडेच २१ सप्टेंबर २०१९ रोजी चीन आणि सोलोमन आयलँड्स दरम्यान औपचारिकरित्या राजकीय संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर १८ दिवसांनंतर सोलोमन आयलँडचे पंतप्रधान सोगावरे हे शिष्टमंडळासमवेत चीनच्या दौर्‍यावर गेले.

किरीबातीनेही पुढे केला आपला हात –
सोलोमन बेटांनंतर प्रशांत महासागरातील बेटांचे राष्ट्र किरीबाती यांनी या सप्टेंबरमध्ये चीनशी १६ वर्षानंतर पुन्हा राजकीय संबंध सुरू केले. किरीबातीचे अध्यक्ष म्हणाले की, देशाच्या विकासासाठी किरीबातीला चीनसारख्या मित्राची गरज आहे.

२१ ऑगस्ट २०१८ रोजी चीन आणि अल साल्वाडोर यांनी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, त्यानंतर साल्वाडोरमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. चीन-साल्वाडोर संबंधात अनिश्चितता होती. या जूनमध्ये नायब बुकेले साल्वाडोरचे अध्यक्ष झाले. डिसेंबरमध्ये बुकाले यांनी चीनला पहिली भेट दिली आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेत शी चिनफिंग यांनी चीन-साल्वाडोर संबंध विकसित करण्याच्या अध्यक्ष बुकेले यांच्या योग्य निर्णयाचे कौतुक केले.

या भेटीदरम्यान, चीनसारख्या महान आणि प्रामाणिक देशाशी संबंध विकसित केल्यास साल्वाडोरला विकासाच्या संधी मिळतील आणि जनतेला मूर्त लाभ होतील, असा आत्मविश्वास बुकेले यांनी व्यक्त केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/