‘कोरोना’च्या नव्या स्ट्रेनचा चीनमध्ये आढळला पहिला रुग्ण

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन (Corona virus new strain) मिळाल्यानंतर संशोधक आणि जगभरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या नव्या स्ट्रेनने ब्रिटनमध्ये हाहाकर उडाला आहे. त्यानंतर आता या नव्या स्ट्रेनचे रुग्ण जगभरात सगळीकडे आढळून येत असून चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा (Corona virus new strain)  प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे.

नवा स्ट्रेन आढळल्यानंतर ब्रिटनने कडक निर्बंध लागू केले आहेत. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. गुरुवरी इंग्लंडच्या लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश भागात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

चीनकडून सिनोफार्मच्या लसीला सशर्त मंजुरी
कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी अनेक देशांत सध्या लसीकरणाची मोहिम सुरु आहे. दरम्यान चीनने गुरुवारी सरकारी कंपनी ‘सिनोफार्म’ द्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना लशीला सशर्त मंजूरी दिली आहे. चीनची ही पहिलीच लस आहे जी सामान्य लोकांसाठी आहे. चीनमध्ये आतापर्यंत चार लशींच्या वापराला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स/सिनोफार्मची पहिली लस आहे. इतर लशींमध्ये सिनोवॅक, वुहान इंस्टिट्यूटची लस, कॅनसिनो बायोलॉजिकल इंकची लस सामिल आहे.

फायझर लसीलाही मिळालाय मंजुरी
जागतिक आरोग्य संघटनेने नववर्षाच्या पूर्व संध्येला फायझर-बायोनटेक लशीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी ब्रिटनने ८ डिसेंबर रोजी या लशीला मान्यता देऊन लशीकरणाची मोहीम सुरु केली आहे. त्यानंतर युरोपियन देशांनीही या लशीला मान्यता दिली आहे. गेल्या एका वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील पहिली लस म्हणून आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिली आहे.