Coronavirus : ‘कोरोना’चं ‘सत्य’ लपवत होता चीन, ‘मजबूरी’मध्ये सांगावं लागलंच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू संबंधी महिती आणि वास्तविक डेटा लपवल्याचा आरोप चीनवर सतत होत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दबावाखाली चीनने मोठा खुलासा केला आहे. चीनने असे म्हटले आहे की, चीनमध्ये 1541 प्रकरणे अशी आहेत ज्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत मात्र त्यांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चीनमध्ये लक्षणे आढळून न आलेल्या या कोरोना व्हायरसमुळे जगभरात चिंता वाढत चालली आहे.

चीनच्या नॅशनल हेल्थ मिशनच्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, चीनमध्ये कोणतीही लक्षणे नसताना एकूण 1541 प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 205 इतर देशांतील लोक आहेत. मात्र, यामध्ये बरे झालेले लोक आहेत का याची माहिती देण्यात आलेली नाही. आतापर्यंत चीनमध्ये 81000 हजार जण कोरोनाबाधित अल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी बहुतांश लोक बरे झाले आहेत. 30 मार्च पर्यंत चीनच्या विविध रुग्णालयात एकूण 2161 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरनाची लक्षणे नाहीत पण रिपोर्ट पॉझिटिव्ह
चीनच्या आकडेवारीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण त्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचा समावेश करण्यात आलेला नाही. जर एखाद्याला कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसली नाही आणि तो त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर चीन त्याला कोरोना झालेल्यांच्या यादीत समाविष्ट करत नाही. दरम्यान दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांचा समावेश अधिकृत आकड्यामध्ये करण्यात आला आहे. ही आकडेवारी प्रीमियर ली केकियांग यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडून लक्षण नसलेल्या प्रकरणाची तपासणी स्कीनिंग वाढवण्याचे आदेश देण्याच्या एक दिवस अगोदर जाहीर करण्यात आले आहेत.

अशा रुग्णांकडून प्रसार होण्याचा धोका
चीनने म्हटले आहे की, लक्षण नसलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकरणामध्ये तपासणी करण्यात येत आहे. ज्यावेळी रुग्णामध्ये लक्षण आढळून येण्यास सुरुवात होते त्यावेळी त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट होते आणि त्याची गणना कोरोनाबाधिताच्या संख्येत केली जाते. संशोधकांना असे आढळून आले आहे की असे रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्याने याचा प्रसार वाढू शकतो. म्हणून चीनमधील लक्षणे आढळून न आलेल्या कोरोना संदर्भात जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

संसर्ग दुसऱ्या मार्गाने पसरत आहे
चीनमधील हा डेटा समोर आल्यानंतर डिसेंबरमध्ये वुहानपासून सुरु झालेल्या कोरोना विषाणूची साथ खरोखरच संपली आहे की नाही याबाबत शंका निर्माण व्यक्त करण्यात येत आहे. काही विश्लेषकांच्या मते, हा रोग चिनमध्ये संपलेला नाही, परंतु तो दुसऱ्या मार्गाने पसरत आहे. दोन आठवड्यापूर्वी चीनमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याचा दावा करण्यात आला होता. चीनमधील एका नियतकालिकाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये आता लक्षण आढळून न आलेल्या संक्रमणाची प्रकरणे समोर येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like