मोठा खुलासा ! चीन 6 वर्षापासून बनवतोय ‘कोरोना’ सारखं जैविक शस्त्र, तिसर्‍या जागतिक युद्धाची करतोय तयारी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीची सुरुवात 2019 च्या अखेरीस चीनमधून झाली आणि तिने वेगाने संपूर्ण जगाला घेरले. आता दुसरे वर्ष सुरू आहे पण जग अजूनही या संकटात अडकलेले आहे. चीनबाबत अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, त्यांनी कोरोना व्हायरस जैविक शस्त्र म्हणून तयार केला आहे. सोबतच अनेक देशांनी या प्रकरणात चीनची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता अमेरिकन तपासकर्त्यांनी काही मोठे खुलासे केले आहेत, ज्यामध्ये या जैविक शस्त्र बनवण्याच्या गोष्टीचा सुद्धा उल्लेख आहे.

अमेरिकन तपासकर्त्यांना एक कागदपत्र सापडले आहे, ज्याच्या आधारावर त्यांनी म्हटले की, चीनचे शास्त्रज्ञ मागील सहा वर्षापासून तिसर्‍या महायुद्धाची तयारी करत आहेत, जे कोरोना व्हायरससारख्या जैविक आणि अनुवंशिक शस्त्रांनी लढले जाईल. या हैराण करणार्‍या कागदपत्रात म्हटले आहे की, युद्धात विजयासाठी हे मुख्य शस्त्र असेल. यात लिहिले आहे की ती चांगली स्थिती कोणती असेल जेव्हा जैविक शस्त्र जारी केले जाईल आणि यामुळे शत्रूच्या वैद्यकीय प्रणालीवर कोणता प्रभाव पडेल. चीन 2015 पासूनच सार्स कोरोना व्हायरसला सैन्य क्षमता म्हणून वापरण्याची तयारी करत होता. अनेक अधिकारी तर आता हे सुद्धा म्हणतात की, कोरोना व्हायरस चीनी लॅबमधून निघाला आहे.

वरिष्ठ अधिकारी देशाबाबत चिंताग्रस्त
पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या शास्त्रांनी आणि आरोग्य अधिकार्‍यांच्या डोजियरमध्ये आजारासह छेडछेड करून एक असे हत्यार बनवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे, जे अगोदर कधीही पाहिले गेलेले नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निकटवर्तीय लोकांच्या हेतुंवर चिंता व्यक्त केली आहे.

ते देशाबाबत भीतीच्या छायेत आहेत कारण लॅबमध्ये होणार्‍या अशाप्रकारच्या हालचालींवर कोणताही प्रतिबंध नाही. कागदपत्र लिहिणार्‍यांनी म्हटले आहे की, तिसरे जागतिक युद्ध जैविक असेल आणि इतर दोन जागतिक युद्धांपेक्षा वेगळे असेल. या दोन युद्धांना केमिकल आणि न्यूक्लियर युद्ध सांगण्यात आले आहे.

जपानवरील अणू हल्ल्याचा उल्लेख
यामध्ये जपानवर टाकण्यात आलेल्या दोन अणू बॉम्ब आणि त्यानंतर त्यांच्या सरेंडर करण्यासोबतच दुसर्‍या जागतिक युद्धाच्या शेवटाचा उल्लेख आहे.

चीनी शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, असे हल्ले स्वच्छ दिवसात केले जाऊ नयेत कारण सूर्यप्रकाश रोग पसरवणार्‍या व्हायरसला मारू शकतो, तर पाऊस किंवा बर्फाचे एयरोसोल कणांना प्रभावित करू शकतात. याऐवजी हे हल्ले रात्री किंवा सकाळी, सायंकाळी किंवा ढग आलेले असताना करावेत, तेव्हा स्थिर हवेच्या दिशेत टार्गेट भागात जारी केले पाहिजे, जेणेकरून हवेने तिथपर्यंत पोहचतील.

आरोग्य प्रणाली उध्वस्त करण्याचा हेतू
कागदपत्रात म्हटले आहे की, अशा हल्ल्यांनी हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रूग्णांची संख्या वाढेल आणि त्या देशाची आरोग्य प्रणाली उध्वस्त होईल. अमेरिकेने चीनच्या या घातक हेतूबद्दल चिंता वयक्त केली आहे. तर ब्रिटनमध्ये परदेशी प्रकरणांच्या समितीचे चेयरमन खासदार टॉम टुगेधांत यांचे म्हणणे आहे की, जे मुख्य नेतृत्वाबाबत बोलत आहेत, त्यांच्या हेतुंबाबत हे कागदपत्र चिंता देणारे आहेत. कितीही कडक नियंत्रण ठेवले तरी ही शस्त्र तरी सुद्धा धोकादायक ठरतील.

या कागदपत्राचे 18 लेखक आहेत, जे ‘उच्च जोखीम’ असलेल्या लॅबमध्ये काम करत आहेत. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टीट्यूटचे एग्झीक्युटिव्ह डायरेक्टर पीटर जेनिंग्ज यांनी सुद्धा यावर चिंता व्यक्त केली आहे.