पहिल्यावेळी चीनमध्ये कसा पसरला ‘कोरोना’ ? WHO च्या तपासापुर्वीच झाला ‘हा’ खुलासा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात चीनला आधीपासूनच बऱ्याच आरोपांचा सामना करावा लागला आहे, तर आता एका अहवालात असे समोर आले आहे की, 7 वर्षांपूर्वी चीनमध्ये व्हायरसचा स्ट्रेन आढळून आला होता जो सध्याच्या कोरोना विषाणूच्या सर्वात जवळचा समजला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये चीनने व्हायरसची माहिती लपविली होती.

सन मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, चीनला 2013 मध्ये कोरोना विषाणूशी संबंधित व्हायरसला जोडलेला स्ट्रेन आढळून आला होता. या व्हायरस स्ट्रेनला चीनने अनेक वर्ष वुहानच्या लॅबमध्ये ठेवला. काही दिवसांपूर्वीच डब्ल्यूएचओने घोषित केले होते की, चीनमध्ये व्हायरसची उत्पत्ती शोधण्यासाठी त्यांची टीम शोध घेईल. त्याच वेळी, आता सात वर्षांपूर्वी सापडलेल्या व्हायरस स्ट्रेनबद्दलची माहिती कोरोनाच्या उत्पत्तीच्या संबंधात महत्त्वपूर्ण मानली जाते.

2012 मध्ये, खाणीत काम करणाऱ्या 6 जणांना ताप, कफ आणि न्यूमोनियाचा त्रास झाला होता. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक होती. अहवालानुसार आजारी पडलेल्या 4 लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरस अँटीबॉडीज आढळले. पण तपासाअगोदरच 2 जणांचा मृत्यू झाला होता.

चीनमधील बॅट वूमन म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. शी झेंगली यांनी फेब्रुवारीमध्ये कोरोनावर एक शैक्षणिक पेपर तयार केला. नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, चीनने वुहानमधील प्रयोगशाळेत वटवाघूळपासून आरटीजी 13 विषाणू ठेवला होता, तो कोरोना विषाणूपासून 96.2 टक्के आहे. परंतु शी झेंगली यांचे सहकारी म्हणतात की, RaTG13 हाच नमुना 2013 मध्ये खाणीत सापडला होता आणि त्यासंबंधित माहिती सार्वजनिक केली गेली नव्हती.

एप्रिलच्या सुरुवातीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, कोरोना विषाणू चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडून आला असल्याचा पुरावा पाहिल्यानंतर मला पूर्ण आत्मविश्वास वाटतो. तथापि, चीनने लॅबमधून व्हायरस पसरण्याच्या सिद्धांताला फेटाळले आहे.