आणखी 4 देशांमध्ये ट्रायल सुरू, चीनची ‘कोरोना’ वॅक्सीन वर्षअखेरीस येईल

नवी दिल्ली : जगात आणखी चार देशांनी कोरोना वॅक्सीनची ट्रायल सुरू केली आहे. हे देश आहेत – पाकिस्तान, सर्बिया, इंडोनेशिया आणि ब्राझील. या चार देशांमध्ये वॅक्सीनवर ट्रायल वेगाने सुरू झाले आहे. दरम्यान, चीनने एक हैराण करणारे पाऊल उचलले आहे. अनेक आठवड्यांपासून त्याने जी कोरोना वॅक्सीन लपवून ठेवली होती, आता ती सार्वजनिक केली आहे. चीनने बिजिंग ट्रेड फेयरमध्ये आपल्या देशात बनवलेली कोविड-19 वॅक्सीन सादर केली. या एग्झीबिशननंतर आता जगभरातील चर्चेला विराम मिळाला आहे. ही वॅक्सीन सायनोवॅक बायोटेक आणि सायनोफार्म औषध कंपनीने एकत्रित बनवली आहे.

दोन्ही कंपन्या किंवा चीनच्या सरकारने या वॅक्सीनला कोणतेही अधिकृत नाव दिलेले नाही, परंतु बिजिंग ट्रेड फेयरमध्ये या वॅक्सीनच्या छोट्या-छोट्या बॉटल सादर करण्यात आल्या होत्या. ही वॅक्सीन फेज-3 ट्रायलमध्ये आहे. अपेक्षा आहे की, ती वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात आणण्याची परवानगी मिळेल.

सायनोवॅक बायोटेक औषध कंपनीने न्यूज एजन्सी एएफपीला सांगितले की, आम्ही वॅक्सीन बनवणार्‍या फॅक्टरीची उभारणी पूर्ण केली आहे. या फॅक्टरीमध्ये 300 मिलियन म्हणजे 30 कोटी डोस वर्षभरात बनवले जाऊ शकतात. बिजिंग ट्रेड फेयरमध्ये बहुतांश लोकांनी वॅक्सीनच्या बूथवरी गर्दी केली होती. कारण चीन सर्वप्रथम कोरोना व्हारसला बळी पडला होता. यानंतर संपूर्ण जग त्रस्त झाले.

चीन संपूर्ण जगात कोरोना व्हायरसला सांभाळण्यात अयशस्वी ठरला आहे. यावरून संपूर्ण जग त्याच्यावर टीका करत आहे, यासाठी आता खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे. तर लागोपाठ अशी कामे करत आहे, ज्यामुळे लोकांचे लक्ष कोरोनावरून विचलित व्हावे. जरी कोरोनाकडे गेले तरी ते सकारात्मक जावे.

चीनचे सरकार आणि मीडिया आता हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, वुहान पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले आहे. या भयानक महामारीने चीनचे काहीही नुकसान झालेले नाही. चीनच्या सरकारने चांगल्या पद्धतीने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की तो कोणत्याही महामारीला रोखण्यात सक्षम आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मे मध्ये म्हटले होते की, चीनची वॅक्सीन पूर्ण जगाच्या भल्यासाठी असेल. चीनची ही वॅक्सीन जगातील त्या 10 वॅक्सीनपैकी एक आहे जी फेज-3 ट्रायलमध्ये गेली आहे. यानंतर बाजारात आणण्याची परवानगी मिळेल. जेणेकरून आजारी लोकांना आणि फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सना संक्रमणापासून वाचवता येईल.

सायनोफार्म औषध कंपनीने म्हटले आहे की, त्यांना पूर्ण विश्वास आहे की, त्यांच्या वॅक्सीनने शरीरात विकसित झालेली अँटीबॉडी एक वर्षापासून तीन वर्षापर्यंत उपयोगी राहते. यानंतर संसर्ग झाला तर पुन्हा वॅक्सीन घ्यावी लागेल. जगाने आता बोलणे थांबवले पाहिजे, आम्ही वॅक्सीन बनवली आहे.

सायनोफार्मच्या चेयरमनने मीडियासमोर सांगितले की, आमच्या वॅक्सीनच्या दोन डोसची किंमत 146 डॉलर म्हणजे 10,723 रुपये असेल. मी स्वता वॅक्सीनचा एक डोस घेतला आहे. मी एकदम व्यवस्थित आहे. माझ्या शरीरात काहीही अडचण नाही. ट्रायल संपल्यानंतर वॅक्सीन आणखी उपयोगी सिद्ध होईल.

दरम्यान, वृत्त असे ही आहे की, चीनी लष्कराने बनवलेली कोविड-19 वॅक्सीन कोरोनाच्या म्यूटेशनशी सुद्धा लढू शकते. याचा अर्थ असा आहे की, शरीरात कोरोना म्युटेशन करून हल्ला करत असेल तर संक्रमित व्यक्तीवर परिणाम होणार नाही. परंतु, दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत मोठ्याप्रमाणात कोविड वॅक्सीनेशन होऊ शकणार नाही.