Coronavirus : ‘कोरोना’चा धोका ! चीननं बंद केला माऊंट एव्हरेटवरील चढाईचा रस्ता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – या मोसमात गिर्यारोहकांसाठी वाईट बातमी आहे. जगातील सर्वात उंच पर्वतावर चढण्यासाठी प्रतिबंध लावला जाऊ शकतो. कारण चीनने आपल्या देशातून माऊंट एवरेस्टवर जाणारा आपला रस्ता बंद केला आहे. हा मार्ग तिबेटमधून जातो. चीनकडून सांगण्यात आले आहे की, गिर्यारोहकांनी माऊंट एवरेस्टवर चीनच्या बाजूने चढण्याचा प्रयत्न करु नये. चीनमध्ये कोरोना पसरल्यानंतर चीनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

एल्पेनग्लो एक्सेपिडिशनचे सीईओ एड्रियन बँलिंगर यांनी सांगितले की रस्ता रोखल्याने काम होणार नाही. परंतु चीनकडून घेण्यात आलेला हा निर्णय महत्वाचा आहे. कारण एवरेस्टच्या बेस कँपवर कोरोना पसरला तर कोणालाही वाचवणे शक्य नाही.

एड्रियन यांनी सांगितले की एवरेस्टवर चढताना मोठा श्वास घ्यावा लागतो. अशात जर कोणाला कोरोनाचे संक्रमण होते तर त्यासाठी हे कठीण होऊ शकते. मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये एवरेस्टवर ट्रफिक जाम झाले होते. तेथे आवश्यकतेपेक्षा जास्त लोक पोहोचले होते. जवळपास 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत अनेक गिर्यारोहकांची चढाईची योजना रद्द केली आहे. परंतु नेपाळकडून असे कोणतेही निर्देश जारी करण्यात आलेले नाही.

या मोसमात आतापर्यंत फक्त 150 लोकांनी माऊंट एवरेस्टवर चढण्याच्या परमिटसाठी अर्ज केला होता. मागील वर्षी एवरेस्टवर चढण्यासाठी 300 पेक्षा जास्त लोकांना परमिट देण्यात आले होते परंतु ज्या प्रकारे कोरोना व्हायरस पसरत आहे त्यामुळे यंदा एवरेस्टवर चढाई होऊ शकत नाही. सध्या माऊंट एवरेस्टवर चढण्यासाठी गिर्यारोहकांना दुप्पट शुल्क मोजावे लागत आहे. हे शुक्ल 7 लाख रुपयांच्या आसपास होते, ते आता 14 लाख रुपये भरावे लागते.