home page top 1

चीनच्या अर्थव्यवस्थेला 17 वर्षातील सर्वात मोठा धक्‍का, भारतावर होणार ‘हा’ परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेबरोबर सुरु असलेल्या व्यापारी युद्धामुळे चीन औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत 17 वर्ष मागे गेला आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, चीनच्या औद्योगिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जुलै महिन्यात हाच उत्पादन दर फक्त 4.4 टक्के इतका होता.

जगभरात वाढली चिंता –

1) चीनची उत्पादने जगभर विकली जातात. तसेच इथले उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्यात देखील होत असते. जगातील व्यापारामध्ये मागील दशकभरात चीनचा वाटा हा एकूण 7 टक्के होता.
2) यावर्षी हाच दर 9 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. चीनमध्येच अनेक वस्तूंच्या किंमती ठरत असल्याने त्यांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे. जगभरात उत्पादन होणाऱ्या स्टील, तांबा आणि कोळसा आणि सिमेंटमधील अर्धा भाग हा चीनमध्ये निर्यात होत असतो. त्यामुळे चीनने खरेदी बंद केली कि, वस्तूंचे भाव कोसळत असतात.

भारतावर काय परिणाम –

1) भारतात सर्वात मोठी आयात हि चीनमधून होत असते. चीन जवळपास आपल्या व्यापारातील 16 टक्के हिस्सा भारतात निर्यात करत असतो. तर भारत चीनला केवळ 4.39 टक्के वस्तू निर्यात करत असतो.
2) त्यामुळे भारतावर याचा फारसा परिणाम होणार नसून यामुळे भारतीय कंपन्यांना चीनमध्ये मोठे मार्केट उपलब्ध होणार आहे.

चीनच्या पुढे राहणार भारताची अर्थव्यवस्था –

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, विकासाच्या बाबतीत भारत चीनच्या फार पुढे असून भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.

Loading...
You might also like