चीनमधून येतोय नव्या प्रकारचा ‘दहशतवाद’ ! ‘रहस्यमय’ बियाणांच्या पार्सलवर अलर्ट जारी

नवी दिल्ली : लडाखमध्ये भारतीय जवानांवरील हिंसक हल्ल्यानंतर भारत आणि चीनमधील तणाव कायम असून या तणावादरम्यान चीन वेगवेगळे प्रकार अजमावत आहे. आता चीनकडून येत असलेल्या नव्या धोक्याबाबत मोदी सरकारने राज्य, उद्योग आणि संशोधन संस्थांना सतर्क केले आहे. सरकारने संशयित सीड पार्सल्सबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये अशाप्रकारची बियाणे असू शकतात जी देशातील जैव विविधतेला धोका निर्माण करू शकतात.

कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, मागील काही महिन्यात जगातील अनेक देशांत अशाप्रकारच्या संशयित बियाणांचे पार्सल पाठवले जात आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपीय देशात अशाप्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. हे पार्सल अज्ञात स्रोतांकडून पाठवण्यात आले आहेत आणि यावर भ्रामक लेबल लावण्यात आले आहेत.

अमेरिकेने घोषित केले अ‍ॅग्रीकल्चर स्मगलिंग
मंत्रालयाने हे देखील सांगितले की, अमेरिकन कृषी विभागाने (युएसडीए)ने यास ब्रशिंग घोटाला आणि अ‍ॅग्रीकल्चर तस्करी म्हटले आहे. युएसडीएने हेदेखील म्हटले की, न मागवलेल्या बियाणांच्या पर्सलमध्ये परदेशी आक्रमक प्रजातीचे बियाणे किंवा रोगजनक सामुग्री पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो. ज्यामुळे पर्यावरण, कृषी तंत्र आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कृषी मंत्रालयाने म्हटले की, न मागवलेले किंवा रहस्यमय सीड पार्सल भारताच्या जैव विविधेसाठी धोका होऊ शकतात.

केंद्राकडून अलर्ट जारी
केंद्राने सर्व राज्यांचे कृषी विभाग, राज्य कृषी विद्यापीठ, बियाणे महासंघ, राज्य बियाणे संस्था, बियाणे महामंडळ, भारतीय कृषी संशोधन परिषद आदींना संशयित बियाणांच्या पार्सलबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे महासंचालक राम कौंडिन्य यांनी म्हटले की, न मागवता पाठवण्यात आलेल्या अनधिकृत स्त्रोतांच्या बियाणामुळे रोपांच्या संभाव्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी हा इशारा आहे. बियाणे दहशतवाद खुप मोठा आहे. हा खुप मोठा धोका आहे.

जैव विविधतेचे नुकसान
त्यांनी म्हटले की, हे बियाणे भारतीय वातावरणात रूजल्यानंतर स्वदेशी पिकांना ते नष्ट करू शकते. भविष्यात याच्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होऊ शकते. या बियाणांचा वापर कुणीही करू नये. अमेरिकेत असे बियाणे मिळाल्यानंतर अलर्ट जारी केला आहे. अशी बियाणे न लावता ताबडतोब नष्ट करावीत.