चीननं नदीचं पाणी रोखल्यानं 4 देश तडफडले, विकृत ‘चेहरा’ आला समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार पसरला असून या व्हायरसची सुरुवात झालेल्या चीनमध्ये व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यांनी आता जगभरात चाचणी किटस, पीपीई किटसचा पुरवठा करायला सुरुवात केली असून त्यांनी इटलीला मदत म्हणून पाठवलेले किटस वापरून विकले होते. तसेच आता त्यांनी नदीचे पाणी रोखले असून चार देशात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

दक्षिण पूर्व आशियाई देशामधून वाहणाऱ्या मेकांग नदीच्या पाण्याचा प्रवाह चीनने कमी केला असून इथे त्यांची क्रूरता दिसून येत आहे. त्यांनी पाणी रोखल्यामुळे थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून कोरोनामुळे शेतकरी, मच्छीमारांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. तसेच आता भारतात येणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याबाबतही शंका निर्माण होऊ लागली आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, चीन फेब्रुवारीमध्ये कोरोनाशी लढत असताना दक्षिण पूर्वेकडील आशियाई देशांच्या मेकांग नदीचे पाणी आटायला लागले असल्यामुळे चीनच्या परराष्ट्र मंत्रींना अचानक लाओसला जावे लागले होते.

दरम्यान वांग यांनी सांगितले की, शेतकरी, मच्छीमारांचे दुःख आम्ही समजू शकतो. चीन सध्या दुष्काळाचा सामना करत असून मेकांग नदीचे पाणी कमी झाले आहे. पण अमेरिकेच्या जलवायू संशोधकांनी सांगितले की, चीनमध्ये काही पहिल्यांदाच दुष्काळ पडलेला नाही. तिबेटच्या पठारावरून वाहणाऱ्या मेकांग नदीच्या पाण्याचा प्रवाह चीनच्या इंजिनियर्सनेच अडवला असेल. त्यामुळे प्रवाह कमी झाला आहे.