‘ड्रॅगन’ अडकला चारही बाजूनं, पर्वतांमध्ये भारताचे लढावू विमानं तर समुद्रात अमेरिकेच्या युध्दनौका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. आता चीन आपल्या शेजार्‍यांना त्रास देण्यासाठी नवीन युक्ती अवलंबत आहे. शेजारच्या देशांना भडकावण्यासाठी त्याने अनेक युक्त्यांचा केल्या. पण आता भारत आणि अमेरिकेने चीनला दडपण्यासाठी दोन बाजूंनी घेरले आहे. यामुळे चीन चांगलेच त्रस्त झाले आहे. चीनचे सैन्य गलवान खोऱ्यातून मागे हटले आहे, परंतु भारताने आपली कठोरता कमी केलेली नाही. दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रात जपानजवळ अमेरिकेने आपली युद्धनौका आणि फ्रिगेट्स तैनात केले आहेत. सोमवारी रात्री लढाऊ हेलिकॉप्टर अपाचेने भारत-चीन सीमेजवळ उड्डाण केले. रात्री उशिरा अपाचेसह अनेक लढाऊ विमाने उड्डाण करताना दिसत होती. त्या सर्वांनी चीनवर लक्ष ठेवले.

भारतीय वायु सेना भारत-चीन सीमेजवळ सतत सराव करत आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. केवळ अपाचे नाही, तर चिनूक हेलिकॉप्टरनेही येथे उड्डाण केले होते. याशिवाय मिग-२९, सुखोई आणि जॅग्वार विमानाने लेहच्या आकाशात उड्डाण केले होते. गेल्याच वर्षी ८ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्सनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात स्थान निर्माण केले होते, त्यानंतर सैन्य अधिक बळकट झाले होते. त्याची शक्ती धोकादायक असते, तसेच त्याची रचना अशी असते की ती रडारमध्ये पकडली जाऊ शकत नाही. अपाचे सुमारे २८० किमी ताशी वेगाने उड्डाण करते, त्याच्यात १६ अँटी-टँक क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता आहे. हे हेलिकॉप्टर सुमारे तीन तास न थांबता उड्डाण करू शकते.

गलवान खोऱ्याच्या आसपासच्या हवाई तळावरुन चीनवर नजर ठेवण्यासाठी मल्टी रोल कॉम्बॅट, मिराज-२०००, सुखोई-३० आणि जॅग्वार हे देखील तैनात केले गेले आहेत. ही सर्व लढाऊ विमाने शस्त्रास्त्रांनी सज्ज असून त्या भागाचे निरीक्षण करत आहेत. दुसरीकडे अमेरिकन नौदलाने दक्षिण चीन समुद्रात जोरदार प्रदर्शन केले आहे. अमेरिकेने आपली युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहे. तसेच बॉम्बरसह एकूण ११ लढाऊ विमानांनी दक्षिण चीन समुद्रावर उड्डाण केले. या सर्व लढाऊ विमानांनी पाळत ठेवणाऱ्या विमानांद्वारे चीनला त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. यादरम्यान अमेरिकेच्या नौदलाच्या अणु युद्धनौका निमित्झ आणि रोनाल्ड रिगन या जगातील सर्वात मोठ्या विमानानेही या सरावात भाग घेतला.

अमेरिकन लढाऊ विमानाने विवादित क्षेत्रात उड्डाण केल्यामुळे चीन भडकला आहे. ग्लोबल टाईम्स या अधिकृत वृत्तपत्राने त्यास शक्तीचे मुक्त प्रदर्शन म्हटले आणि अमेरिकेला धमकी दिली. ग्लोबल टाईम्सने म्हटले की, पीएलए अमेरिकेच्या कोणत्याही कारवाईवर सुयोग्य उत्तराची वाट पाहत आहे. अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रावर बी-५२एच स्ट्रॅटॉफोर्ट्रेस हेवी स्ट्रॅटेजिक बॉम्बर तैनात केले आहे. अमेरिकेच्या दोन युद्धनौका USS Nimitz and USS Ronald Reagan दक्षिण चीन समुद्रात तैनात आहेत. अमेरिकेच्या दोन्ही युद्धनौकांवर एफए-१८ई सुपर हॉर्नटचे दोन स्क्वाड्रन आणि आणि ईए-१८जी ग्रोलर इलेक्ट्रॉनिक अटॅक जेट्स तैनात आहेत. या सर्व युद्धनौकांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने समुद्रात अनेक पाणबुडी देखील तैनात केल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like