China-US Tension : ‘ड्रॅगन’नं दक्षिण चीन सागरामधील विवादीत क्षेत्रामध्ये क्षेपणास्त्रांनी केलं टेस्ट फायर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण चीन समुद्रात अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये वाद सुरू आहे. दरम्यात आता अशी माहिती मिळाली आहे की, ड्रॅगनने दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त क्षेत्रात मिसाइलचं टेस्ट फायर केलं आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या मिसाइलच्या निशाण्यावर अमेरिकेचे सैन्य असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट वर्तमानपत्राने हाँगकाँगच्या रिपोर्टने चिनी सेनेच्या काही अज्ञात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सांगितले की, चीनने DF-26B आणि DF-21D मिसाइलने बुधवारी दक्षिणी द्वीप प्रांत हैनान आणि पेरासेल बेट समूह यांच्या मध्ये असणाऱ्या भागाला निशाणा बनवलं आहे. पण चीनच्या परराष्ट्र विभागाने यावर कोणतेही उत्तर दिले नाही.

जगातील सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या मार्गांपैकी एक असणाऱ्या दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिका आणि इतर दक्षिण राष्ट्रांसोबत चीनचा वाद सुरू आहे. ट्रम्प प्रशासनाने या वर्षी चीनच्या अनेक वादग्रस्त भागांना तो भाग चीनचा नसल्याचं वक्तव्य केलं आहे. यामध्ये काही क्षेत्रावर व्हिएतनाम, फिलिपिन्स सारख्या आणखी काही राष्ट्रांनी दावा केला आहे.

बुधवारी चीनने एक तक्रार केली की, अमेरिकेच्या U2 विमानांनी उत्तर भागात सैन्य ड्रिलच्या वेळी बीजिंग द्वारे घोषित करण्यात आलेल्या “नो फ्लाय झोन” मध्ये प्रवेश केला.

DF-21D मिसाइल बलशाली असून या मिसाइलला सैन्य विश्लेषकांकडून “वाहक हत्यारा” मानण्यात आलं होतं. असं मानलं जातं की याला अमेरिकी वैमानिकांना निशाणा बनवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. जर भविष्यात अमेरिकेसोबत वाद वाढला तर चीन या मिसाइलचा वापर करू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील दोन दशकात चीनने संरक्षणावर मोठा खर्च केला आहे.

‘द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने सांगितलं की, DF-26B ला उत्तर-पश्चिम प्रांतात लॉन्च केलं गेलं आणि DF-21D ला पूर्वेला शांघाईच्या दक्षिणेला झेजियांग प्रांतात लॉन्च केलं आहे. असं मानलं जात कि, DF-26B परमाणू घेऊन जाण्यासाठी सक्षम आहे.