ग्लोबल टाईम्सनं दिली तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी, म्हणाले – ‘अमेरिकेपासून दूर रहा’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – तैवान आणि अमेरिकेच्या जवळीकतेमुळे चीन चिंताग्रस्त आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ परराष्ट्र विभागाच्या अधिकारी किथ क्राच यांनी तैवानला दिलेल्या भेटीनंतर चीन चलबिचल झाला आहे आणि तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. चीनचे मुखपत्र, ग्लोबल टाईम्स या अधिकृत वृत्तपत्राने तैवानचे राष्ट्राध्यक्षा त्साई इंगेवेन यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.

ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की, तैवानच्या नेत्या त्साई अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय अधिकाऱ्याबरोबर डिनर करुन अग्नीशी खेळत आहेत. चिनी वृत्तपत्राने असे म्हटले आहे की, जर त्साई वेनच्या कोणत्याही कृतीतून चिनी कायद्याचे उल्लंघन झाले तर युद्ध सुरू होईल. ग्लोबल टाईम्सने अशी धमकी अशा वेळी दिली आहे जेव्हा चीनी लढाऊ जेट विमान तैवानच्या हवाई क्षेत्रात सतत प्रवेश करत असतात.

शुक्रवारी चीनमधील 18 लढाऊ विमानांनी एकाच वेळी तैवानच्या सीमेवर घुसखोरी केली होती. या चिनी घुसखोरी करणाऱ्या ताफ्यात 12 जे -16 लढाऊ विमान, 2 जे -10 लढाऊ विमान, 2 जे -11 लढाऊ विमान, 2 एच -6 अणुबॉम्बर आणि एक वाई -8 अँटी सबमरीन विमान होते. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी चीनने आपली 19 जहाजं तैवानच्या हवाई क्षेत्रावर पाठविली.

चीनच्या या चिथावणीखोर कृत्याच्या वेळी अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री किथ क्राच तैवानचे लोकशाही व्यवस्थेत रूपांतर करणारे माजी राष्ट्रपती ली टेंग हुई यांना श्रद्धांजली अर्पण करीत होते.18 सप्टेंबर रोजी त्यांनी तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांच्यासमवेत रात्रीचे जेवण केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्याने ही सर्व उच्चस्तरीय भेट घेतली. यापूर्वी अमेरिकेचे आरोग्यमंत्री अ‍ॅलेक्स अझर यांनीही तैवानला भेट दिली होती.