सीमा वादादरम्यान चीनने वाढवली भारताची चिंता! ब्रह्मपुत्र नदीवर बांधत आहे धरण

बिजिंग : चीन तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर एक प्रमुख धरण बांधणार आहे आणि पुढील वर्षी लागू होणार्‍या 14 व्या पंचवार्षिक योजनेत याच्या संबंधित प्रस्तावावर विचार करण्यात आला आहे. चीनच्या अधिकृत मीडियाने धरण बांधण्याचा ठेका मिळालेल्या एका चीनी कंपनीच्या प्रमुखाच्या संदर्भाने ही माहिती दिली आहे.

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, पॉवर कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ चायनाचे अध्यक्ष यांग जियोंग यांनी म्हटले की, चीन यारलुंग जंग्बो नदी (ब्रह्मपुत्रचे तिबेटीयन नाव) च्या खालच्या भागात जलविद्युत उपयोग योजना सुरू करणार आहे आणि ही योजना जल संसाधने आणि स्थानिक सुरक्षा मजबूत करेल.

ग्लोबल टाइम्सने रविवारी ’कम्युनिस्ट यूथ लीग ऑफ चायना’ च्या केंद्रीय समितीच्या वुई-चॅट अकाऊंटवर टाकण्यात आलेल्या एका लेखाचा संदर्भ देऊन माहिती दिली आहे की, यांग यांनी सांगितले आहे की, सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) देशातील 14वी पंचवार्षिक योजना (2021-25) तयार करण्याच्या प्रस्तावात या योजनेचा समावेश करणे आणि 2035 पर्यंत या द्वारे दिर्घकालिन लक्ष्य मिळवण्यावर विचार केला आहे.

भारत आणि बांग्लादेशतून जाते ब्रह्मपुत्र नदी
या योजनेबाबत सविस्तर माहिती पुढील वर्षी नॅशनल पिपल्स काँग्रेस (एनपीसी) द्वारे औपचारिक घोषणा केल्यानंतर समोर येण्याची अपेक्षा आहे. ब्रह्मपुत्र नदी भारत आणि बांग्लादेशातून पुढे जाते. यामुळे धरणाच्या निर्मितीच्या प्रस्तावाने दोन्ही देशांची चिंता वाढली आहे. मात्र, ही चिंता फेटाळत चीनने म्हटले की, तो या देशांच्या हिताकडेही लक्ष ठेवणार आहे.