‘पाक’व्याप्त (PoK) काश्मीरमध्ये चीनचा वीजप्रकल्प; भारताचा विरोध

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरअंतर्गत (सीपीईसी) चीन पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये 1,124 मेगावॅटचा प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. दरम्यान या प्रकल्पाला भारताने विरोध केला, तरीही चीन-पाकिस्तानकडून या प्रकल्पावर काम सुरू आहे.

ऊर्जामंत्री ओमर आयूब यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या ‘खासगी ऊर्जा आणि पायाभूत सुविधा मंडळा’च्या (पीपीआयबी) 127 व्या बैठकीत या कोहला जलविद्युत प्रकल्पाचा तपशील सादर करण्यात आला. या बैठकीत चीनचे थ्री गॉर्जेस कॉर्पोरेशन, पाकव्याप्क काश्मीरमधील अधिकारी आणि ‘पीपीआयबी’ यांच्यात त्रिपक्षीय कराराला अंतिम रूप देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, झेलम नदीकिनारी हा प्रकल्प उभारण्यात येणार असून याद्वारे पाकिस्तानी नागरिकांना माफक दरात वर्षाला पाच अब्ज युनिट वीज पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 2.4 अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, या भागातील ‘स्वतंत्र ऊर्जा उत्पादना’तील (आयपीपी) ही सर्वांत मोठी गुंतवणूक असल्याचे समजते.

चीनला अरबी समुद्रात मिळणार प्रवेश

तीन हजार किमीच्या ‘सीपीईसी’ चा उद्देश चीन आणि पाकिस्तानला रेल्वे, रस्तेमार्ग, पाइपलाइन आणि ऑप्टिकल केबल फायबर नेटवर्कने जोडणे आहे. चीनचा झिनजियांग प्रांत आणि पाकिस्तानच्या ग्वादर बंदरला जोडणाऱ्या या पट्ट्यामुळे चीनला अरबी समुद्रात प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, ‘सीपीईसी’ पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने, भारताने याबाबत आपला विरोध आधीच सांगितला आहे. माहितीनुसार, चीनची सरकारी कंपनी आणि पाकिस्तान लष्कराच्या व्यावसायिक विभागामध्ये डायमर-भाषा धरणाबंदरलारणीसाठी 442 अब्ज रुपयांच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे. मागच्या महिन्यात गिलगिट-बाल्टिस्तानमधील या धरणाच्या बांधकामा संदर्भात भारताने पाकिस्तानला इशारा दिला होता, आणि अवैधरित्या ताब्यात असलेल्या प्रांतांमध्ये असे प्रकल्प राबवणे योग्य नसल्याचे म्हटले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like