चीन PAK ला देतोय खुपच खतरनाक हत्यारे, जाणून घ्या भारताची तयारी काय ?

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – चीन पाकिस्तानला चार आक्रमक ड्रोन देण्याची तयारी करीत आहे. या ड्रोन्ससोबत चीन त्यांना शस्त्रेही देणार आहे. चीन या ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये त्याच्या मदतीने बनत असलेले इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि ग्वादर बंदरवर आपले नवीन चिनी नौदल बेसला वाचवेल, असे चीनचे म्हणणे आहे. ग्वादर बलुचिस्तानच्या दक्षिण पश्चिममध्ये आहे. येथे चीन आपला नौदल बेस तयार करण्याची तयारी करत आहे. एवढेच नव्हे तर चीनने पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर, रस्ते इत्यादींसाठी 60 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, चीन पाकिस्तानला दोन सिस्टम देत आहे. प्रत्येक सिस्टीममध्ये लाँच ग्राऊंड स्टेशन आणि दुसरा ड्रोन असेल. चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे 48 आक्रमक ड्रोनवर काम करत आहेत. हे ड्रोन्स पाकिस्तान आपल्या हवाई दलासाठी वापरणार आहे. जीजे -2 ड्रोन्स असे या ड्रोनचे नाव आहे. हे चीनच्या विंग लूंग -2 चे हे अत्याधुनिक मॉडेल आहे. चीनने अनेक आशियाई देशांना विंग-लूंग -2 ड्रोनची विक्री केली आहे.

स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, चीनने 2008 ते 2018 दरम्यान कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, अल्जेरिया, सौदी अरेबिया, युएईला 163 ड्रोनची विक्री केली आहे. असे म्हटले जाते की, चीन जीजे -2 ड्रोन एकाचवेळी 12 क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकतात. हे क्षेपणास्त्रे हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. सध्या याचा वापर लिबियात होत आहे. ज्यामध्ये गेल्या दोन महिन्यांत चार मारले गेले आहेत.

भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला हल्ले ड्रोन देणे ही भारतासाठी थोडी चिंताजनक बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताला आता मीडिया अल्टीट्यूड लाँग एन्ड्युरन्स (MALE)कडून लैस प्रीडेटर-बी ड्रोनची योजना पुन्हा सुरू करावी लागेल.

प्रीडेटर-बीच्या नौदल आवृत्तीसाठी भारतीय नौदल अमेरिकेशी चर्चा करीत आहे. परंतु त्याची किंमत इतकी वाढत आहे की, अशा प्रकारचे ड्रोन घेण्याचे नियोजन केले जात आहे, जे देखरेख आणि हल्ला देखील होऊ शकेल. प्रीडेटर-बी ड्रोन याला एमक्यू -9 रीपर म्हणून देखील ओळखले जाते. या ड्रोनने इराक, अफगाणिस्तान आणि सीरियामधील दहशतवाद्यांना उडवून दिले होते. यात 4 हॅल-फायर क्षेपणास्त्रे आणि दोन लेसर मार्गदर्शित क्षेपणास्त्रे लागतात.

डीआरडीओ आणि भारतातील काही खासगी कंपन्या हल्लेखोर आणि सर्विलांस वाले ड्रोनही बनवत आहेत. त्याचे काम चालू आहे. भारताकडे सध्या रुस्तम ड्रोन आहे. जे या सर्व ड्रोनप्रमाणे कार्य करू शकते.