गलवानमध्ये 33 दिवसांत चीनने उभारले तब्बल 16 लष्करी ‘कॅम्पस’

लडाख : चीनने गलवान खोर्‍यात 33 दिवसांत तब्बल 16 लष्करी कॅम्पस उभारल्याचे भारतीय लष्कराला मिळालेल्या सॅटेलाईट छायाचित्रातून उघड झाले आहे. त्यामुळे एकंदरीत लडाख समीमेवरील गलवान खोर्‍यात आपण 1 किलोमिटर मागे हटल्याचा दावा चीनने केला असला तरी त्यांची मस्ती या प्रकारावरून कायम असल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील 9 किलोमीटर हद्दीतील ही सॅटेलाईट छयाचित्रे आहेत. भारतीय लष्कराने गलवान नदीवर उभारलेली संरक्षक भींतही चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने उद्ध्वस्त केल्याचे यातून दिसत आहे. प्लॅनेट लॅबच्या कॅमेर्‍यात कैद झालेल्या या छायाचित्रातून चीनचा खोडसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. ताडपत्र्या घातलेले तंबू, शेकडो ट्रक्स, बुलडोझर्स यांची वर्दळ सुरू असल्याचेही याठिकाणी दिसत आहे.