चीनने बनवला कृत्रिम सूर्य, खर्‍यापेक्षा 10 पट जास्त ‘शक्तीशाली’, जाणून घ्या वैशिष्ट्य

बिजिंग : चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत नित्य नवीन उंची गाठत आहे. याबातीत चीनने अमेरिका, रशिया आणि जपान या विकसित देशांना मागे टाकले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य अणू फ्यूजन रिअ‍ॅक्टरचा यशस्वीपणे जगात दुसर्‍या सूर्याचा दावा खरा करून दाखवला आहे. हे असे अणू फ्यूजन आहे, जे खर्‍या सूर्यापेक्षा अनेक पट जास्त उर्जा देईल. चीनच्या सरकारी मीडियाने शुक्रवारी आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे.

चीनचा हा कृत्रिम सूर्य बनवण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू होता. कृत्रिम सूर्याच्या प्रोजेक्टच्या यशाने चीनला विज्ञान जगतात त्या उंचीवर पोहचवले आहे, जिथे आजपर्यंत अमेरिका, जपानसारख्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत देशसुद्धा पोहचू शकलेले नाहीत.

न्यूक्लियर रिसर्चची कमाल
चीनी मीडियाच्या रिपोर्टनुसार, चीनने या प्रोजेक्टची सुरूवात 2006 मध्ये केली होती. चीनने कृत्रिम सूर्याला एचएल-2एम नाव दिले आहे, हा चायनाने नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनसोबत साऊथवेस्टर्न इंस्टीट्यूट ऑफ फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी मिळून बनवला आहे. या प्रोजेक्टचा उद्देश हा सुद्धा होता की, प्रतिकूल हवामानात सुद्धा सोलर एनर्जी बनवता येईल. कृत्रिम सूर्याचा प्रकाश खर्‍या सूर्यासारखा तेजस्वी असेल. अणू फ्यूजनच्या मदतीने तयार या सूर्याचे नियंत्रण सुद्धा याच व्यवस्थेद्वारे होईल.

150 मिलियनपर्यंत राहील तापमान
चीनी मीडियाने रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, कृत्रिम सूर्याच्या कार्यप्रणालीत एका शक्तीशाली चुंबकीय क्षेत्राचा वापर केला जातो. या दरम्यान तो 150 मिलियन म्हणजे 15 कोटी डिग्री सेल्सियसचे तापमान मिळवू शकतो. पीपल्स डेलीनुसार, हा खर्‍या सूर्याच्या तुलनेत दहापट जास्त उष्ण आहे.

खर्‍या सूर्याचे तापमान सुमारे 15 मिलियन डिग्री सेल्सियस आहे. पृथ्वीवरील न्यूक्लियर रिअ‍ॅक्टर्सबाबत बोलायचे तर, येथे उर्जा उत्पन्न करण्यासाठी विभाजन प्रक्रियेचा वापर होतो. हे तेव्हा होते, जेव्हा उष्णता अणूला विभाजित करून उत्पन्न होते. अणू फ्यूजन वास्तवात सूर्यावर होते आणि याच आधारावर चीनचा एचएल-2एम बनवण्यात आला आहे.

सिचुआनमध्ये केली निर्मिती
चीन सिचुआन प्रांतातील या रिअ‍ॅक्टरला ’कृत्रिम सूर्य’ म्हटले जाते. हा खर्‍या सूर्याप्रमाणे प्रचंड उष्णता आणि वीज निर्माण करू शकतो. चीनी मीडियाच्या रिपोर्टनुसार, न्यूक्लियर फ्यूजन एनर्जीचा विकास चीनच्या रणनिती संबंधी उर्जेची गरज पूर्ण करण्यासह चीनच्या एनर्जी आणि इकॉनॉमीच्या नेहमीच्या विकासात सहायक सिद्ध होईल.

इतक्या खर्चात तयार केला कृत्रिम सूर्य
फ्यूजन प्राप्त करणे खुप कठिण आहे आणि या प्रोजेक्ट म्हणजे आयटीईआरचा एकुण खर्च 22.5 बिलियन डॉलर आहे. जगातील अनेक देश सूर्य बनवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गरम प्लाझ्मा एका ठिकाणी ठेवणे आणि त्यास फ्यूजनपर्यंत त्याच स्थितीत ठेवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या.