Coronavirus : चीनमधील परिस्थिती ‘हाताबाहेर’, WHO नं घोषित केली ‘हेल्थ इमर्जंसी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये शनिवारी सुरु होणारा नवीन वर्षाचा(लुनर ईयर) उत्सव विस्कळीत झाला आहे. रहस्यमयी कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढल्यानं वुहान सहित 13 शहरातील सार्जनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. 4 कोटींहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या देशात सर्वच हालचाली ठप्प झाल्या आहेत. चीनमधील अनेक भाग, मंदिरं बंद करण्यात आली आहेत. नवीन वर्षात नेहमीच मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चीनमध्ये या व्हायरसमुळे अद्याप 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. 830 हून अधिक लोक यामुळे संक्रमित झाले आहेत.

चीनसाठी हेल्थ इमर्जंसीची घोषणा
जागतिक आरोग्य संघटनेनं चीनसाठी हेल्थ इमर्जंसी घोषित केली आहे. अद्याप संघटनेनं ग्लोबल इमर्जंसी घोषित केलेली नाही. अशी घोषणा झाल्यानंतर कोरोना व्हायरससोबत निपटण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न वाढवले जातात.

वुहानसोबत संपर्क तोडला
नव्या वर्षातील सुट्ट्यांमध्ये लाखो नागरिकांची देश आणि परदेशातील लाखो नागरिकांची ये जा वाढल्यानं या व्हायरसचं संक्रमण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. हीच गोष्ट लक्षात घेता प्रभावित शहरांमधील ये जा थांबवण्यात येत आहे. गेल्या महिन्यात हुबेई प्रांताची राजधानी वुहानमधून या व्हायरसचं संक्रमण सुरू झालं होतं. याच शहरातून जास्त प्रकरणं समोर येताना दिसत आहेत. गुरुवारपासूनच वुहानमधून परिवहन नेटवर्क आणि बाहेर जाणारी उड्डाणं बंद आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like