सर्जिकल स्ट्राइक-२ वर चीनने दिली ‘ही’ प्रतिक्रिया 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने आज  मोठा कारवाई केली. वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० हजार किलोचा बॉम्बचा हल्ला करत उद्ध्वस्त केला आहे.सुमारे ३०० दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे. या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला पाठिंबा दिल्यानंतर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. चीनने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

भारत पाकिस्तानच्या संबंधांवरच आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहे.भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम राखावा , दोन देशांमधील संबंध आणि सहकार्य यांच्या आधारावरच दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकते, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे.

‘सर्जिकल स्ट्राइक-२ ला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा – पाकिस्तानने या हल्ल्याचा प्रतिकार केला जाईल, असे म्हटल्यानंतर चीनने दोन्ही देशांना संयम बाळगावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. भारताने केलेल्या या हल्ल्याला ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करावा असेही ऑस्ट्रेलियाने सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताला आत्मरक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हणत इस्रायल , अमेरिका ,रशिया , आफ्रिका यांसारख्या देशांनी पाठींबा दिला होता.