भारतानं अमेरिकेसोबत सुरू असलेल्या ‘कोल्ड वॉर’मध्ये सहभागी होऊ नये, चीननं दिला ‘गंभीर’ इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   चीन आणि अमेरिकेमध्ये मोठ्या कालावधीपासून ट्रेड वॉर सुरू आहे. तर मागच्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत झाले आहेत. यासाठी चीनने भारताला सक्त सल्ला दिली आहे की, अमेरिका-चनीच्या दरम्यान सुरू असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर रहावे. चीनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने भारताला सल्ला देताना म्हटले आहे की, अमेरिका आणि चीनच्या प्रकरणापासून दूर रहाणे भारताच्या हिताचे आहे. चीनने इशार्‍याच्या रूपात लिहिले आहे की, जर भारताने, अमेरिकेसोबत मिळून चीनच्या विरोधात काहीही केले तर कोरोना महामारीदरम्यान आर्थिक परिणाम खुप वाईट होतील.

भारताचा शेजारी देश चीनने म्हटले आहे की, भारताने या कोल्ड वॉरपासून दूर रहाणे चांगले आहे. दोन्ही देशातील व्यापारी संबंध कायम राहावेत. भारतासोबत व्यापारी संबंध चांगले ठेवणे आमचे लक्ष्य आहे. यासाठी चीन भविष्यातही भारतात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणांसाठी दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक चांगले ठेवेल.

चीनने पुढे इशारा देताना म्हटले आहे की, पुढे जाऊन भारताला राजकीय कारणांमुळे आर्थिक दुष्परिणाम भोगावे लागतील अशा कोणत्याही परिस्थितीपासून भारताने दूर राहीले पाहिजे. मोदी सरकारने भारत-चीन संबंधासाठी एक सकारात्मक विचारधारा घेऊन पुढे आले पाहिजे.

चीनने भारताला केवळ आर्थिक परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आली आहे. शिवाय कोरोनाच्या वाढत्या प्रकरणादरम्यान लॉकडाऊन हटवण्यावरूनही खिल्ली उडवली आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या प्रस्तावाबाबत चीनी मीडियाने म्हटले होते की, चीन आणि भारताला वर्तमानात सीमेवर जारी स्थितीतून मार्ग करण्यासाठी अमेरिकेच्या सहकार्याची आवश्यकता नाही.

यापूर्वी लडाखमध्ये भारत-चीन लष्करामध्ये तणावाची स्थिती पाहता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, आम्ही भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये सीमा वादावर मध्यस्थी करण्यासाठी तयार, इच्छूक आणि सक्षम आहे.

चीन परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या ट्विटला कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही. परंतु, सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने एका लेखात म्हटले आहे की, दोन्ही देशांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अशा सहकार्याची गरज नाही. भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चा करून मुद्दा सोडवण्यासाठी सक्षम आहेत. दोन्ही देशांना अमेरिकेपासून सतर्क रहावे, जो शांतता आणि सद्भावना बिघडवण्याची संधी शोधत आहे.