कंपन्यांच्या स्थलांतराच्या हालचालींमुळे चीनचा तिळपापड, म्हणाला – ‘भारत बनू शकत नाही पर्याय’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस महामारीचा सल्पाय चेनवर परिणाम झाल्याने चीनमधून सुमारे 1000 कंपन्यांना आपला तेथील उद्योग गुंडाळून भारतात परतायचे आहे. सध्या एका जर्मन शूज कंपनीने आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट चीनमधून हटवून आग्रामध्ये स्थलांतरीत करणार असल्याचे म्हटले आहे. तर ओप्पो आणि एम्पल कंपन्यांनी सुद्धा असेच संकेत दिले आहेत. यावर चीन संतापला आहे. चीनचा हा संताप मुखपत्र ग्लोबल टाइम्समध्ये स्पष्ट दिसत आहे.

चीनने वेस्टर्न मीडियाला म्हटले दलाल
ग्लोबल टाइम्सच्या एका लेखात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. याशिवाय तो चीनला पर्याय बनण्याचे स्वप्न पाहात आहे. परंतु, भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही. या लेखातील शब्दांवरूनच चीनच्या संतापाचा स्तर दिसून येत आहे. या लेखात चीनने वेस्टर्न मीडियाला दलाल देखील म्हटले आहे.

ग्लोबल टाइम्सने मीडिया रिपोर्टचा संदर्भ देत म्हटले की, भारतातील उत्तर प्रदेश राज्याने चीनमधून आपले युनिट शिफ्ट करण्याच्या विचारात असलेल्या कंपनीला आकर्षित करण्यासाठी एक इकॉनॉमिक टास्क फोर्स गठीत केला आहे. परंतु, भारताचा हा विचार चुकीचा आहे. भारत जगाच्या समोर चीनसाठी पर्याय बनू शकत नाही.

चीनच्या लष्कराची लडाख, उत्तर सिक्किममध्ये उग्र भूमिका

भारत आणि चीनमध्ये विवादित नसलेल्या सीमेवर उत्तर सिक्किम आणि लडाखच्या जवळ अनेक भागात तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देश तेथे अतिरिक्त लष्कर तैनात करत आहेत. दोघांमध्ये या ठिकाणी काही दिवसांपूर्वी हिंसक संघर्षदेखील झाला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, भारत आणि चीन दोघांनी डेमचक, दौलत बेग ओल्डी, गलवान नदी तसेच लडाखमध्ये पैंगोंग सो सरोवराजवळ संवेदनशील भागात अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे.

गलवान जवळच्या परिसरात दोन्ही देशात सहा दशकांपासून संघर्ष सुरू आहे. 1962 मध्ये सुद्धा या भागात संघर्ष झाला होता. सूत्रांनी सांगितले की, दोन्ही देशांनी गलवान नदी आणि पैगोंग सो सरोवराच्या जवळ आपले जवान तैनात केले आहेत. या भागात दोन्ही देशांकडून सीमेवर गस्त घालण्यात येत आहे. चीनने गलवान खोर्‍यात मोठ्या प्रमाणात तंबू उभारले आहेत. ज्यानंतर भारताने येथे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. पैंगोंग सो सरोवर परिसरात 5 मेरोजी भारत आणि चीनच्या सुमारे 250 सैनिकांमध्ये लोखंडाच्या सळई, काठ्यांनी चकमक झाली होती आणि दगडफेकसुद्धा झाली होती. यामध्ये दोन्हीकडील सैनिक जखमी झाले होते.