वुहाननं असं काय केलं की फक्त 2 आठवडयात सुमारे 65 लाख लोकांची केली ‘कोरोना’ टेस्ट

बीजिंग : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधील ज्या वुहान शहरातून कोरोना संसर्गाचा प्रसार झाला. त्याच वुहान मध्ये ७८ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर संसर्गावर मात करण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण नसताना पुन्हा संसर्गित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे येथील आरोग्य प्रशासनाने शहरातील सर्व नागरिकांची कोरोना संसर्ग टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. फक्त २ आठवड्यांच्या कालावधीत जवळपास ६५ लाख नागरिकांची कोरोना संसर्ग टेस्ट केली आहे. पण हे शक्य आहे का? वुहानने हे केलं कस?

येथील नागरिकांना कोरोना संसर्ग टेस्टसाठी रुग्णालयात जावं लागत नाही. तर आरोग्य विभागाचे कर्मचारीच त्यांच्यापर्यंत पोहचतात. मार्केट, बांधकाम सुरु असलेली ठिकाण तसेच घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी नागरिकांच्या टेस्ट करत आहेत. तसेच आरोग्य विभाग नागरिकांना आपल्या टेस्ट करण्यासाठी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जागृत करत आहे. वुहान मध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय वँग युआन यांनी म्हटलं, यांच्या परिसरातील सर्व नागरिकांची टेस्ट एकाच दिवसात पूर्ण करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिसरामध्येच शिबिराच आयोजन करण्यात आलं होत. एका दिवसात हजारो लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यासाठी इतर राज्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आलं असल्याचं माहिती दिली.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्याचीही खबरदारी प्रशासनानं घेतली आहे. नागरिकांना एक निश्चित वेळ दिली जाते. त्या वेळेत येऊन टेस्ट करण्यास सांगितलं जात. जेणेकरून गर्दी होणार नाही. टेस्टिंग शक्यतो मोकळ्या जागेत केली जाते. टेस्टिंगच्या लाईनमध्ये दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी दोन मीटर चे अंतर ठेवण्यात येत आहे. तसेच टेस्टिंगसाठी आल्यानं मास्क बंधनकारक आहे.

जगभरातील इतर देश एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट करून शकत नाही. परंतु, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या येणाऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी चीन सरकारनं संपूर्ण शहराच्या टेस्टिंगची योजना बनवली आहे. पुढील पंधरा दिवसात संपूर्ण वुहान परिसरातील नागरिकांची टेस्ट करण्यात येणार आहे.

याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगमधील व्हायरोलॉजिस्ट जिन डाँगयान यांनी सांगितलं की, चीन सरकारचा हा प्रयत्न गरजेपेक्षा जास्त आहे. शिवाय त्यांच्या आकडेवारीत विश्वासार्हता नाही. एवढ्या कमी वेळात इतक्या नागरिकांची टेस्टिंग शक्यच नाही. उत्तम दर्जाच्या लॅबमध्ये देखील यापेक्षा जास्त वेळ लागतो. ज्याप्रकारे येथील टेंटमध्ये टेस्टिंग केल्या जात आहेत. त्यामुळे चुकीचे आकडे समोर येऊ शकतात. ही टेस्टिंग प्रक्रिया वुहानच्या नागरिकांसाठी धोकादायक असल्याचं मत त्यांनी मांडल.