चीनला मोठा धक्का ! ‘युवान’ चलनाने गाठली 11 वर्षातील सर्वात ‘निच्चांकी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या ‘ट्रेड वॉर’चे परिणाम आता दोनीही देशांवर दिसायला लागले आहेत. सोमवारी चीनचे युवान या चलनाने ११ वर्षातला सर्वात निच्चांकी गाठला आहे. एक अमेरिकन डॉलरच्या तुलनेने युवान 7.1487 वर आला आहे. चीनी शेयर बाजारचे प्रमुख इंडेक्स शंघाई (Shanghai Composite) कंपोजिट आणि हाँग काँग के प्रमुख इंडेक्स हैंगसैंग (Hang Seng) मध्ये 2.5 % ची मोठी घसरण झाली आहे.

यावेळी हैंगसैंग 800 ने तुटला आहे. गेल्या काही काळामध्ये दोनीही देश एकमेकांना तोटा कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत. याच कारणामुळे अमेरिकेला नुकसान व्हावे यासाठी चीनने आपल्या करंसी युवानचे अवमूल्यन केले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चिनी वस्तूंच्या किमतीत मोठी घसरण झाली.

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे चलनात घसरण –

शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले की, चीन च्या आयात वस्तूंवर कर आतापासून 25 % नाहीतर 30 % लागणार आहे. तसेच ३०० अरब डॉलर वरील वस्तूंवर सुद्धा १० % नाहीतर १५ % कर लागणार आहे. हा सर्व कर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे.

तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या बाजारात असणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना दुसरीकडे जाण्यास सांगतिले आहे त्यामुळे शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.

जागतिक शेअर बाजारात हाहाकार –

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या बाजाराबाबत आणि बदलेल्या आयकराबाबत ट्विट करताच जागतिक शेअर बाजारात मोठ्या संख्येने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. प्रमुख बेंचमार्क इंडेक्स डाओ जोंस 623 अंक आणि नैस्डैक 3 % पर्यंत घसरून बंद झाला. आशियाच्या बाजारामध्ये चीन, जपान,कोरिया आणि भारताच्याही शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या