सागरी सुरक्षेचा प्रश्न ‘ऐरणी’वर ; कोकणातल्या दाभोळ खाडीत आढळल्या चीनच्या २ ‘बोटी’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बोटींविषयी कुठलीच पूर्वकल्पना नसल्याने त्याविषयीचं गुढ वाढलं आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस आणि विविध सुरक्षा संस्था तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या या मासेमारी बोटी दिडशे फुट लांबीच्या आहेत. या बोटींवर ३७ खलाशी आहेत . या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. मात्र बोटींकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही कळविण्यात आले आहे. तसेच रत्नागिरीतल्या खाजगी मरीन एजन्सीचीही चौकशी सुरु आहे.

आठ दिवसांपूर्वीच पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळली होती. अन्नधान्य आणि इंधनाचा मोठा साठा असलेली ही बोट श्रीलंकेच्या समुद्रातून पालघरच्या समुद्रात आली होती.