धक्कादायक ! विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला ‘महाप्रसाद’ आणि ‘बेदम’ चोप

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबादमधील चिंचोली लिंबाजी येथील जिल्हा परिषद शाळेत मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला नागरिकांनी चोप दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून हा मुख्याध्यापक शाळेतील अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करत होता. नागोराव कोंडीबा काकळे असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव असून तो या मुलींची छेड काढत होता. चौथीतील एका मुलीने आपल्या पालकांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पालकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र ती मुलगी शाळेत जात नसल्याने पालकांनी तिला याबाबत सविस्तर विचारले असता हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हि मुलगी एकटीच या प्रकाराला बळी पडली नसून आणखी अनेक मुलींबरोबर त्याने हे दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या संतप्त पालकांनी १५ ऑगस्ट म्हणजेच भारताच्या स्वातंत्रदिनी या नराधम मुख्याध्यापकाला चांगलाच चोप दिला. त्यामुळे काही काळ शाळेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तात्काळ पोलीस पाटलांनी पिशोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश पवार यांना याविषयी माहिती दिल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like