Chinchwad by-Election | चिंचवड पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील दोन नावांची चर्चा, निवडणूक बिनविरोध होणार?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chinchwad by-Election | चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) पोटनिवडणूक (Chinchwad by-Election) जाहिर केली आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होऊन 2 मार्चला निकाल जाहिर केला जाणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) जगताप यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तूर्तास वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे.

 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad by-Election) लक्ष्मण जगताप यांच्या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाणार असे वातावरण सध्या तयार होत आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि माजी नगरसेवक शंकर जगताप (Former Corporator Shankar Jagtap) यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे. मात्र यामध्ये अश्विनी जगताप यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

 

चिंचवड पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या जागेच्या अनुषंगाने प्रमुख पक्षांच्या पातळीवर चर्चा होत आहे. सलग तीन वेळा चिंचवड मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे लक्ष्मण जगताप यांच्याच कुटुंबातील सदस्याला या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. शंकर जगताप आणि अश्विनी जगताप या दोघांच्या नावाची प्राथमिक पातळीवर चर्चा सुरु आहे.

शंकर जगताप हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजप चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे (Chinchwad Assembly Constituency) प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. तर कौटुंबिक पातळीवर अश्विनी जगताप यांच्या राजकीय प्रवेशावर कुटुंबात चर्चा होऊन एकमत झाले तर त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात हा निर्णय जगताप कुटुंब घेणार असल्याने पक्षीय पातळीवर सावध भूमिका घेतली जात आहे.

 

लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी कर्करोगाने निधन झाले होते.
त्यामुळे या जागेवर कोणाला संधी मिळणार याची चर्चा सध्या सुरु आहे.
शंकर जगताप यांच्यावर भाजपने 2019 ची मनपा निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती.
त्यांनी ती योग्य पद्धतीने पार पाडली होती. त्यामुळे एका गोटातून शंकर जगताप यांच्या नावावर विचार केला जाऊ शकतो.

 

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण जगताप आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या दुरंगी लढत झाली होती.
या निवडणुकीत जगताप यांना 1 लाख 50 हजार 723 तर राहुल कलाटे
यांना 1 लाख 12 हजार 225 मते मिळाली होती.
तर तिसऱ्या क्रमांकाची 5,868 मते ‘नोटा’ला मिळाली होती. जगताप हे 38 हजार 498 मतांनी विजयी झाले होते.

 

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर दोन महिन्यातच निवडणूक होत आहे.
त्यामुळे जगताप कुटुंबातील उमेदवार दिला तर सहानुभूतीच्या लाटेत उमेदवार निवडू येईल अशी चर्चा आहे.
त्यामुळे भाजप अश्विनी जगताप किंवा शंकर जगाताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Chinchwad by-Election | possibility of candidacy of jagtap family member for by election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…