पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chinchwad Bypoll Election | चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही पिंपरी-चिंचवड शहराच्या परिवर्तनाची नांदी असेल. मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll Election) यश पाहिजे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकाहून सांगितले. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, पुण्यामध्ये काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. तसा प्रयत्न आपण चिंचवडमध्ये करणार आहोत. उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Chinchwad Bypoll Election) चित्र स्पष्ट होईल. आपल्याला महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार निवडून आणायचा असून त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले पाहिजे.
आदेशाचे पालन झाले पाहिजे
उमेदवारी मागण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना आहे. मात्र वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचे पालन झाले पाहिजे. गद्दारी होता कामा नये. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. 25 वर्ष झालीत शहराची एकहाती सत्ता होती. माझे शहरावर नेहमीच प्रेम राहिले आहे. शहराचा विकास व्हावा ही माझी प्रामाणीक इच्छा असते, तसे नेहमीच मी झुकते माप दिले आहे. सहानुभूती नाही, तर विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
… म्हणून नाना काटेंना उमेदवारी दिली
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे. नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देताना
तोडीस तोड उमेदवार होते. मात्र त्यांनी पिंपळे सौदागरचा कायापालट केला आहे.
त्या परिसरात चांगला विकास झाला आहे. म्हणून नाना काटे यांना उमेदवारी दिली. प्रचारासाठी अनेक नेते येतील.
मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे, असे अजित पवारांनी ठणकावून सांगितले.
मतभेद बाजूला ठेऊन कामाला लागा
मावळमधील 25 वर्षाची सत्ता आपण उलथवून लावली तशी ताकद आता चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत
दाखवायची आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून सार्वांनी कामाला लागा.
राज्यात गलिच्छ घाणेरडे, राजकारण झालेले आपण पाहिले.
आता ही निवडणूक जिंकून त्यांना दाखवून देण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे अजित पवार म्हणाले.
Web Title :- Chinchwad Bypoll Election | we should get success in chinchwad by election says ajit pawar in pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या प्रचाराचे लोण शोळेपर्यंत ! पालकांकडून संताप व्यक्त
Saumya Tandon | ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनने केला एक धक्कादायक खुलासा; म्हणाली…