Chinchwad Bypolls | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवाराने आणली चक्क एवढ्या हजार रूपयांची चिल्लर

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – Chinchwad Bypolls | दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bypolls) जागेसाठी निवडणुक जाहीर झाली आहे. आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. मात्र यावेळी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाची झलक या मतदारसंघात अर्ज दाखल करताना दिसली. रयत विद्यार्थी परिषदेचे राजू काळे (Raju Kale) हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले असता, त्यांनी डिपॉझीट दाखल करण्यासाठी तब्बल १० हजार रूपयांची नाणी आणली होती. राजू काळे यांनी १० हजार रूपयांची नाणी आणल्यामुळे मोजताना मात्र अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली.

आज कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypolls) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्यासाठी घाई करण्यात येत असतानाच, रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १० हजार रूपयांची नाणी डिपॉझीट म्हणून जमा करण्यासाठी आणली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, यामुळे निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. क्षणभर सगळ्यांना मकरंद अनासपुरे यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाची आठवण झाली.

मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटामध्ये देखील
मकरंद अनासपुरे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अगदी काही तास शिल्लक राहिले असतानाच मोठ्या
प्रमाणावर नाणी घेऊन येतात. त्यामुळे मात्र निवडणुक विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते.
चिंचवड मतदारसंघातून भाजपकडून (BJP) आश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी जाहीर
करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देण्यात
आली आहे. तर राहूल कलाटे (Rahul Kalate) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

Web Title :-  Chinchwad Bypolls | congress and ncp activists campaigning for tambe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांचा डोंबाऱ्याचा खेळ;’ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर घणाघात

Balasaheb Thorat | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर इंदुरीकर महाराजांची स्तुतीसुमने; म्हणाले…

Manmad Accident News | मुंबई-आग्रा महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात; 40 प्रवासी जखमी