श्रीपाद छिंदम याने दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याने अहमदनगर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्याने यावेळी साध्या पध्द्तीने कसलाही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मागील दोन महिन्यापासून छिंदम प्रभाग क्रमांक ९ मध्ये येऊन मतदारांची दिलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागत आहे. तसेच आपल्याला मतदान द्यावे असे नम्र आवाहन करतो आहे. त्याच्या जातीच्या मतदारांकडे तो विशेष लक्ष देत असल्याचे वृत्त आहे. श्रीपाद छिंदम याला भाजप आणि काँग्रेस आघाडीकडून तगडी आवाहने दिली जाण्याची चर्चा अहमदनगर मध्ये आहे. तर छिंदम निवडून येण्याची शक्यता दूर पर्यत दिसत नाही असे जनसामान्यात बोलले जाते आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला फोनवरून बोलत असताना छिंदम याने शिवजी महाराजांचा अवमान होईल असे वक्तव्य केले होते त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर त्याच्या घरावर आणि त्याच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भाजपने तातडीने निलंबित केले होते.

अहमदनगर महानगरपालीकेच्या प्रभाग क्रमांक  नऊमध्ये पदमशाली समाजाची मते निर्णयक ठरतात मागील वेळी त्याच  मतांवर छिंदम महानगरपालिकेवर निवडून गेला होता त्याच्या उमेदवारीवर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त  केले असून अहमदनगर महानगरपालीकेच्या प्रभाग क्रमांक नऊचा निकाल बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत.