59 अ‍ॅप्सवर बंदी नंतर चीनी मीडियाने व्यक्त केला संताप, आनंद्र महिंद्रांनी दिले चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन दरम्यान कमांडर-स्तरीय चर्चेच्या एका दिवस आधी केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. यात टिक-टॉक आणि यूसी ब्राऊझर सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे. यानंतर भारत सरकारच्या निर्णयाचे कौतुक होत असताना, चीनमधील लोक संतापून प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. अ‍ॅप्सवरील बंदीनंतर चीन आंतरराष्ट्रीय कायद्यांचा हवाला देत चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेही भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताच्या या कारवाईला सामोरे जात एका चिनी पत्रकाराने सरकारच्या या कारवाई विरुद्ध ट्विट केलं. तो म्हणाला की, भारतीय लोक असे काहीच करत नाहीत की ज्यावर आम्ही बहिष्कार घालू शकतो. यावर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारे त्या पत्रकाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

ग्लोबल टाईम्सचे संपादक आणि चिनी पत्रकार हू झिजिन यांनी ट्विट केले आहे की, चीनमधील लोकांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची इच्छा आहे, परंतु वस्तुत: भारतीय असे काही करत नाहीत की ज्यावर आपण बहिष्कार घालू शकतो. भारतीय मित्रांनो, तुम्ही अशी काही कामे करावी जी राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाच्या आहेत.

यावर आनंद महिंद्रा यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मला शंका आहे की ही टिप्पणी भारतीय कंपन्यांसाठी अतापर्यंतचे सर्वात प्रभावी आणि प्रेरणादायी वक्तव्य आहे. आपल्या प्रोत्साहानाबद्दल धन्यवाद !

भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे खवळलेल्या चीने आता आंतरराष्ट्रीय कायद्याचा संदर्भ देत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, परिस्थितीचे बारकाईने परीक्षण केले जात आहे. चीन सरकार नेहमीच चिनी व्यवसायिकांना आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करण्यास सांगते.आता भारत सरकारवर चिनी गुंतवणूकदारांसह आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे कायदेशीर हक्क राखण्याची जबाबदारी आहे. दरम्यान, गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर भारतामध्ये चिनी मलावर बहिष्कार टाकण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.