3-5 वर्षापर्यंत भारतातून नाहीसा होईल चीनी कंपन्यांचा दबदबा : उद्योगपती गौतम अडानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्येष्ठ उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपनीने ८ गिगावॅट (जीडब्ल्यू) उत्पादन – संबंधित सौर उर्जा प्रकल्पाचे टेंडर मिळवले आहे. त्यामध्ये ते सुमारे 45,000 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. एका मुलाखतीत अदानी म्हणाले की, चीनकडून सौर उपकरणांची आयात पुढच्या ३  -५ वर्षात कमी होईल. सध्या भारतीय बाजारात त्याचा ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.

ही निविदा अदानी ग्रीन एनर्जीने मिळवली आहे. कंपनीचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत २५ गिगावॅट क्षमतेसह या सेगमेंटमध्ये वर्ल्ड लीडर बनण्याचे आहे. या निविदेत ८ गिगावॅटचे सौर उर्जा आणि २ गिगावॅटचे सौर पेशी आणि मॉड्यूल उत्पादन क्षमता तयार करणे आहे. यामुळे ४ लाख रोजगार निर्माण होतील.

अदानी म्हणाले की, त्यांचा ग्रुप सौर उपकरण उत्पादनात इक्विटी आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसाठी चर्चा करत आहे. सौर उपकरणांच्या निर्मितीमध्ये तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. ते म्हणाले की, भारतात केवळ त्यांच्या ग्रुपकडेच टोटल आणि विल्मर सारख्या कंपन्यांसह ५०:५० टक्के भागीदारीत काम करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.

देश वेगाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे
अदानी म्हणाले की, देश वेगाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. ते म्हणाले की आतापर्यंत ९०% चिनी उपकरणे आयात केली जातात, जी आता ५० टक्क्यांपर्यंत खाली येतील आणि पुढील ३ ते ५ वर्षांत हे पूर्णपणे नष्ट होईल. अदानी यांना विश्वास आहे की, या गुंतवणूकीमुळे ते जगातील सर्वात मोठी सौर कंपनी होतील.

२०२५ पर्यंत २५ गिगावॅट उत्पादन करून अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला जगात वर्ल्ड लीडर बनायचे आहे. ते म्हणाले की, तोपर्यंत १८-२० गिगावॅटचे थर्मल उत्पादन होईल आणि सौर उत्पादन त्यापेक्षाही अधिक होईल.